नाशिकरोड | Nashik

एकलहरे रोड वरील किलोस्कर कंपनीच्या डोंगरला दुपारच्या दरम्यान अचानक आग लागली.

अगिशमक दलाला सदर महिती कळविण्यात आली. त्या नुसार नाशिक रोड अगिशमक दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली.

एकलहरे रोड किलोस्कर कंपनी ची मोठी जागा पडीत असून या ठिकाणी मोठा डोंगर परिसर सुध्दा आहे.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली. सदर आग लागल्या चे देवेंद्र दिक्षित यांनी पाहिले.

नाशिक रोड अगिशामक दलाला महिती दिली. महिती मिळताच अगिशमक बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे दोन तासांच्या परिश्रम नंतर आग आटोक्यात आणली.

आग वेळेत विझली मुळे कोणतेही नुकसान झाले नाही. यावेळी अगिशमक दलाचे मोहन मघे, रामदास काळे, रमेश दाते, शिवाजी खुळगे, अशोक मिलीमणी आदी उपस्थित होते.