पिंपळगाव विकास सोसायटी चेअरमनपदी खोडे

पिंपळगाव विकास सोसायटी चेअरमनपदी खोडे

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

येथील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी विनायक चंद्रकांत खोडे (Vinayak Chandrakant Khode as Chairman) तर व्हा. चेअरमनपदी सोमनाथ खंडेराव मोरे यांची बिनविरोध निवड (Unopposed selection) करण्यात आली आहे.

काही दिवसापूर्वी झालेल्या येथील सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (election) सभासदांनी माजी सरपंच भास्कर बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे यांच्या नम्रता पॅनलला बहुमताचा कौल दिला.

त्यामुळे पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) सोसायटी पदाधिकार्‍यांची निवड बिनविरोध होणार हे चित्र मतमोजणीनंतर अधिक स्पष्ट झाले होते. एकूण 13 पैकी 9 जागांवर नम्रताचे उमेद्वार निवडून आले होते. सोसायटी सभागृहात पदाधिकारी निवडी संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी महेश भडांगे (Returning Officer Mahesh Bhadange) यांच्या अध्यक्षतेखाली व सभासदांच्या उपस्थितीत गुरुवारी विशेष बैठक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चेअरमन पदासाठी विनायक चंद्रकांत खोडे व व्हा.चेअरमन पदासाठी सोमनाथ खंडेराव मोरे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी चेअरमनपदी विनायक खोडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सोमनाथ खंडेराव मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर नम्रताच्या समर्थकांनी गुलाल उधळून व पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

यावेळी नम्रता पॅनलचे नेते भास्कर बनकर, पंढरीनाथ देशमाने, साहेबराव मोरे, चंद्रकांत खोडे, माजी पं.स. सभापती राजेश पाटील, काका मेंगाणे, अ‍ॅड.रणजित चव्हाण सभागृहात उपस्थित होते. त्यांनी निवडीनंतर दोन्ही पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. यावेळी संचालक दिलीप मोरे, चंद्रकांत बनकर, रामराव डेरे, अनिल बनकर,

शोभा बनकर, हिराबाई खोडे, आशिष बागूल, सुरेश खोडे, सतीश मोरे, नंदू देशमाने, दत्तात्रय देवकर उपस्थित होते. तसेच नम्रताचे राहुल बनकर, सत्यजित मोरे, रामराव मोरे, शिवा बनकर, अरुण लभडे, नितीन बनकर, कौस्तुभ तळेकर, ईश्वर बोथरा, संजय वाघ, आरीफ काझी, रमेश विधाते, केशव बनकर, हर्षल जाधव, मोतीराम पवार आदींनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू शेतकरी सभासदांनी निवडणुकीत आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सारेच कटिबद्ध असून यापुढे सर्वांना बरोबर घेऊन आमचे संचालक मंडळ संस्थेचे कामकाज प्रामाणिकपणे करतील. संस्था आणि संस्थेच्या सभासदांच्या हिताच्या दृष्टीने काम करतील. संस्थेच्या सभासदांच्या विश्वासाला कदापि तडा जावू देणार नाही याची काळजी आमचे संचालक मंडळ घेतील.

- भास्कर बनकर, नम्रता पॅनलचे नेते (पिंपळगाव बसवंत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com