खेरवाडीची कांचन झाली मोटार वाहन निरीक्षक

पहिल्याच प्रयत्नात यश
खेरवाडीची कांचन झाली मोटार वाहन निरीक्षक

खेरवाडी । Kherwadi

येथील कांचन शंकर आवारे हिची एमपीएससी परीक्षेमार्फत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदी निवड होऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे तिने नुकताच पदभार स्वीकारला आहे. तालुक्यात पहिल्यांदाच या पदावर निवड होण्याचा बहुमान कांचनने मिळविल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कांचनचे प्राथमिक शिक्षण येथेच होऊन के.के. वाघ कॉलेज चांदोरी येथे पॉलीटेक्निक शिक्षण केले. त्यानंतर पुढील डिग्रीचे शिक्षण गोखले कॉलेज ऑफ इंजिनिअर नाशिकला करत असताना शेवटच्या वर्षी अहोरात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन परीक्षेत प्रावीण्य मिळविले.

तिच्या गुणांची टक्केवारी व योग्य शरीरयष्टीमुळे तिची निवड झाली. खेरवाडी ते नाशिक दररोज बसने ये-जा करत तिने नाशिक येथे डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले. बर्‍याच वेळा बस वेळेवर येत नसताना तासन्तास उभे रहावे लागत असल्याचा अनुभव तिने सांगितला. तसेच बराच वेळा धोका पत्करून खासगी वाहनाने ही प्रवास केला.

शेतकरी कुटुंब असल्याने सुट्टीच्या दिवशी कांचन आई-वडिलांना शेती कामात मदत करीत असल्याने अभ्यास करून काम करण्यापेक्षा काम करून अभ्यास केल्याचे ती सांगते. आपली मुलगी सरकारी अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याने त्यांचे उपकार अविस्मरणीय आहे.

तसेच मुलींनी या विज्ञान युगात काही ठराविक स्त्रीविषयक काही सामाजिक बंधने बाजूला सारून ध्येयनिश्चितीने अभ्यास करून शरीरयष्टीला प्राधान्य दिले तर यश निश्चित मिळते असेही कांचनने सांगितले. तिच्या या यशाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com