खेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार अखेर निलंबित
नाशिक

खेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार अखेर निलंबित

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

तालुक्यातील खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अ. ज्ञा. होमकर यांनी निलंबित केले आहे.

इगतपुरी तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी पदावर डॉ. पवार हे काही वर्षापूर्वी कार्यरत होते. त्यांच्याबाबत तत्कालीन सभापती, उपासभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदींनी तक्रारी केल्या होत्या. अनेकदा पदाधिकाऱ्यांसोबत मोठे वाद आणि तक्रारी वाढल्या होत्या. खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.

डॉ. संजय पवार हे सामान्य रुग्णांबरोबर नेहमीच अरेरावीने वागत, प्रा. आ. केंद्रातील कर्मचारी ते जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांचे बरोबरच लोकप्रतिनिधींना सुध्दा ते जुमानत नसत, तालुका आरोग्य अधिकारी असतांना केलेल्या नियमबाह्य कामकाज याचा सातत्याने पाठपुरावा करून निलंबन करण्यासाठी पत्रव्यवहार केला. डॉ. संजय पवार यांची पाठराखण करणाऱ्या तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे यांच्या वर कारवाई करण्यासाठी सुद्धा शासनास योग्य पुरावे सादर करणार आहे.

- हरिदास लोहकरे, जि. प. सदस्य, खेड

Deshdoot
www.deshdoot.com