शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी : जिल्हा बँकेतर्फे खरीप पीक कर्ज वाटप सुरू
नाशिक

शेतकऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी : जिल्हा बँकेतर्फे खरीप पीक कर्ज वाटप सुरू

वि. का. सोसायटीत संपर्क साधा - अध्यक्ष केदा आहेर

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी

शासनाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्षांक दिला आहे.त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीक कर्जासाठी पात्र आहेत.

त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा,असे आवाहन अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

राज्य शासनाकडून महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम जिल्हा बँकेच्या एक लाख ३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आलेली आहे.

शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्षांक दिला आहे. त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत.

त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या व पात्र शेतकऱ्यांना पुरेशा निधी अभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत.

बँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून, खरीप कर्ज वाटपाला गती येत आहे.राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेने नियोजन सुरू केले आहे.

आजपर्यंत जिल्हा बँकेने १४६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून बँकेस खरीप पिक कर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्षांक पूर्ण करणार आहे. पात्र शेतकरी सभासदांनी सबधीत विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय सेवकांची नियुक्ती केली आहे. कर्ज वाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.
केदा आहेर, अध्यक्ष (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक)
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com