खरीप पिक
खरीप पिक
नाशिक

पेठ : पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके धोक्यात

त्र्यंबक, इगतपुरीतही अशीच परिस्थिती

Gokul Pawar

Gokul Pawar

पेठ । Peth

तालुक्यात अद्यापपर्यत हंगामी पावसाचा लपंडाव सुरु असून यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले.

दरम्यान बळीराजाने भात तसेच नागलीची लागवड केल्यानंतर पुरेसा पाणीच झाला नाही. मागील दहा बारा दिवसा पासून पावसाने दडी मारल्याने भात, नागली, वरई आदी पिके जाळून जात आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे साठवण पाण्याची सुविधा आह, त्यांनी पिकांना पाणी देऊन जगवित आहेत. तर दुसरीकडे पाण्याची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

एकूणच जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत इथला शेतकरी असून पेठ तालुक्यासह, त्र्यंबक , इगतपुरी तालुक्यातही हीच परिस्थिती पाहावयास मिळत आहे. एकीकडे करोनामुळे हवालदिल झाले असतांना दुसरीकडे शेतीची अशी अवस्था पाहून बळीराजा चिंताक्रांत झाला आहे .

Deshdoot
www.deshdoot.com