वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात

वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात

वाजगाव |वार्ताहर| Vajgav 

देवळा तालुक्यातील खर्डे येथील हनी-बनी एइंग्लिश मेडियम स्कुलचे वार्षिक स्नेह संमेलन आज (दि.४ रोजी) प्रमुख आकर्षक अभिनेता, मॉडेल सुरज कुमार, तोसिफ सय्यद मॉडेल, अँकर व अभिनेत्री, मॉडेल तालुक्याची कन्या निवेदिता पगार आणि देवळा नगसेवक व देवळा अग्रो प्रोड्युसर चे संचालक संभादादा आहेर, डी.वाय.एस.पी. अँटी करप्शन ब्युरो शिरीष जाधव, देवळा कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती बापू देवरे आणि प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदिरा गांधी विद्यालयात येथील प्रारंगणात आयोजित करण्यात आले. 

यावेळी शाळेच्या चुमीकल्यानी विविध गाणे, लावण्या व नृत्य सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधले. तर काही चिमुकल्यानी नुकत्याच कोरोना महामारीवर आधारीत  कुटुंबावर आलेल्या संकटात कुटुंबप्रमुख महामारीत मयत पावतो व त्यानंतर कुटुंबाला झालेले दुःख, कुटुंब चालवण्यासाठी भेडसावणारी आर्थिक अडचण नाट्यरूपात सादर केल्याने श्रोत्यांचे अश्रू अनावरण झाले.

तर काही चिमुकल्यानी देशभक्तीपर गीत व नाट्य सादर करत भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देत देशाप्रती आपली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी प्रमुख अतिथीनी आपले मनोगत व्यक्त केले, यात प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या हनी-बनी एइंग्लिश मेडियम स्कुल ने अल्पावधीतच पालकांचा विश्वास संपादन केला व कोरोना काळात सर्वच शाळा बंद होत्या पण एकमेव हनी - बनी स्कुल मोठ्या जिखरीने सुरू ठेवत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सातत्यान सुरू ठेवत आज होऊ घातलेले सांस्कृतिक कार्यक्रम येवढ्या मोठ्याप्रमाणात होत असल्याचे श्रेय शाळेचे आधार स्तंभ तथा संस्थेचे संचालक किरण जाधव याचे कौतुक केले.

आणि आपल्या स्कुलच्या माध्यमातून असेच शिक्षण देत पुढील वर्ग सुरू करून तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी उच्चस्तरीय शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन आपल्या तालुक्यासह गावाचे नावलौकिक करावे असे प्रेरणादायी उद्गार डी.वाय.एस.पी. अँटी करप्शन ब्युरो शिरीष जाधव यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांना संबोधित केले. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com