खंडेराव महाराज यात्रोत्सव स्थगित

कृषिमंत्री भुसेंच्या हस्ते उद्या महापूजा
खंडेराव महाराज यात्रोत्सव स्थगित

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

उत्तर महाराष्ट्रासह (North Maharashtra) राज्यातील लक्षावधी भाविकांचे आराध्य दैवत (Adorable deity) असलेल्या श्रीक्षेत्र चंदनपुरी (Chandanpuri) येथील श्री खंडेराव महाराजांच्या (Shri Khanderao Maharaj) यात्रोत्सवावर (Yatraotsava) सलग दुसर्‍या वर्षी देखील करोनाचे (corona) सावट आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव बंद ठेवण्याचे निर्देश शासनातर्फे देण्यात आले आहेत.

यासंदर्भात प्रांत विजयानंद शर्मा (Province Vijayanand Sharma) यांनी यात्रा स्थगित ठेवण्याचे आदेश ग्रामपंचायतीसह मंदिर ट्रस्टला (Temple Trust) दिले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी देखील खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव स्थगित राहणार असल्याने याचा मोठा फटका हॉटेल, खेळणी, भांडी व इतर किरकोळ संसारोपयोगी वस्तू विक्रेत्यांसह करमणुकीची साधने लावणार्‍या व्यावसायीकांना बसणार आहे.

तब्बल 15 दिवस चालणार्‍या या यात्रेत राज्यातील भाविक हजेरी लावत असल्याने मोठी आर्थीक उलाढाल होत असल्याने व्यावसायीकांसाठी चंदनपुरीची यात्रा दरवर्षी आर्थीक दिलासा देणारी ठरते. यामुळे दरवर्षी हजार ते दीड हजारापर्यंत लहान-मोठी दुकाने चंदनपुरीत (chandanpuri) थाटण्यात येत होती. मात्र करोनामुळे (corona) यात्रा बंद राहणार असल्याने लहान-मोठ्या व्यावसायीकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

सोमवार दि. 17 जानेवारीस पौष पौर्णिमेपासून श्री खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास करोना नियमांचे पालन करत प्रारंभ होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dadaji Bhuse) व अनिता भुसे (anita bhuse) यांच्या हस्ते देवाची महापूजा (mahapuja) केली जाणार असून या महापूजेस निमंत्रित 50 भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पूजेसह खंडेराव महाराजांची तळी भरण्यात आल्यानंतर भंडारा उधळून यात्रोत्सवास प्रारंभ केला जाईल.

यानंतर खंडेराव महाराजांच्या मुखवट्याची फुलांनी सुशोभित पालखीतून मिरवणूक काढली जाणार आहे. या पालखी मिरवणुकीत देखील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 25 भाविकांनाच सहभागी करण्यात येणार आहे. वाद्यांना यंदा परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती सरपंच विनोद शेलार यांनी दिली.

शासनातर्फे यात्रोत्सवास परवानगी नाकारण्यात आली असली तरी मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.संक्रमण फैलावणार नाही, यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 50 भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनासाठी भाविकांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र (vaccination vertificate) दाखविणे बंधनकारक राहणार आहे. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ट्रस्टतर्फे मंदिर परिसरात लोखंडी बॅरिकेटींग करण्यात आले असून अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत.

मंदिर व परिसरात सॅनिटायझरसह जंतूनाशकांची फवारणी सातत्याने केली जाणार आहे. भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील मागितला असल्याची माहिती जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतिश पाटील यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

ग्रामपंचायतीस यात्रा अनुदान मिळावे

श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी शासनाच्या आदेशामुळे स्थगित राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे 5 ते 6 लाख रूपयांचे उत्पन्न बुडणार आहे. या उत्पन्नातूनच 25 सेवकांचे वेतन व यात्रा परिसरासह ग्रामस्वच्छतेसाठीचा खर्च भागविला जात होता. दोन वर्षापासून उत्पन्नाअभावी सेवकांचे वेतन अदा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शासनाने चंदनपुरी ग्रामपंचायतीस यात्रा अनुदान देत सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा सरपंच विनोद शेलार यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.