पावसाने विश्रांती घेताच 'पुष्पा गॅंग' सक्रीय; मध्यरात्री 'अशा' ठोकल्या बेड्या

पावसाने विश्रांती घेताच 'पुष्पा गॅंग' सक्रीय; मध्यरात्री 'अशा' ठोकल्या बेड्या

सुरगाणा | Surgana

सुरगाणा (Surgana), पेठ (Peth) या भागात मुसळधार पावसाने (Rain) आठवडापासून विश्रांती घेतली आहे. यामुळे पुन्हा खैर (Khair) तस्कराची (Smuggling) टोळी या भागात जंगलात सक्रिय होऊ लागली आहे. बाऱ्हे वनपरिक्षेत्रात खैर तस्करी रोखण्यास वन अधिकाऱ्यांना मोठे यश आले आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, पळसन वनपरिक्षेत्रातील (Palasan Forest Range) बोरपाडा वन परिमंडळ अंतर्गत असलेल्या भागातून डी.जे. १५ झेड ४४७० या क्रमांकाच्या पिकअप गाडीतून काही संशयित व्यक्ती खैराची लाकडे (Khair wood) अवैधरित्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती पळसन वनपथकाला मिळाली होती.

त्यानुसार नाशिक उपवनसंरक्षक पंकज गर्ग (Pankaj Garg) यांच्या मार्गदर्शनाखाली बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. कवर, तसेच फिरते पथकाचे अधिकारी सुरेश गवारी, पळसन येथील वनपाल बी. सी. भोये, वनरक्षक टी. एच. खांडवी, खडकमाळचे वनरक्षक वाय. एस. गावित यांचे पथक तयार केले.

पावसाने विश्रांती घेताच 'पुष्पा गॅंग' सक्रीय; मध्यरात्री 'अशा' ठोकल्या बेड्या
मविप्र निवडणूक : प्रगती-परिवर्तनमध्ये सरळ लढत; 'यांचा' पत्ता कट

गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. मात्र कुणकुण लागतातच खैर तस्कर आणि साथीदारानी फरार होण्यासाठी वाट बदलली.

वनअधिकाऱ्यांनीदेखील दुसऱ्या वाटेने वाहनाद्वारे गुजरातकडे जाणारी चोर वाट गाठली. बोरपाडा रस्त्यावरून जात असताना बोरपाडा हद्दीत पथकाने वाहनाद्वारे त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला.

पावसाने विश्रांती घेताच 'पुष्पा गॅंग' सक्रीय; मध्यरात्री 'अशा' ठोकल्या बेड्या
नाशिक-औरंगाबाद रोडवर छोटा हत्ती-स्कूल बसची जोरदार धडक; दोन गंभीर

त्यानंतर खैराच्या लाकडांनी भरलेली गुजरात प्रादेशिक परिवहन विभागाची पासिंग असलेली पिकअप ताब्यात घेण्यात आली. ही गाडी पळसन वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आली.

वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी वाहनाचा जप्ती पंचनामा केला. पिकअपमधून खैराचे वीस नग (घनमीटर 0.907) वन कर्मचाऱ्यांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी संशयित पिकअप चालकासह अज्ञात तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com