रक्कम मिळाल्याशिवाय केजीएस सुरू होऊ देणार नाही

ऊस थकबाकीदार शेतकरी बैठकीत रायते यांचे प्रतिपादन
रक्कम मिळाल्याशिवाय केजीएस सुरू होऊ देणार नाही

निफाड। प्रतिनिधी Niphad

पाच वर्षापासून पिंपळगाव निपाणी (Pimpalgaon Nipani) येथील केजीएस साखर कारखान्याकडे (KGS Sugar Factorie) गोदाकाठ ऊस उत्पादक (Sugarcane growers) शेतकर्‍यांचे (Farmers) कोट्यावधी रूपयांचे ऊसाचे पेमेंट थकलेले आहे. आता कारखाना दुसरी कंपनी (Company) सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्याने आमची थकबाकी मिळाल्या शिवाय आम्ही केजीएस साखर कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा शिंगवे येथे आयोजित केजीएस ऊस उत्पादक थकबाकीदार शेतकर्‍यांच्या बैठकीत देण्यात आला.

सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांच्या नेतृत्वाखाली थकबाकीदार (Arrears) ऊस उत्पादकांचा लढा लढण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलतांना अनेक शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या 2017-18 सालापासून केजीएस साखर कारखान्याकडे गोदाकाठ परिसरातील ऊस ऊत्पादकांचे 7 ते 8 कोटी रूपये थकलेले आहे. शेतकर्‍यांनी अनेकदा कारखाना स्थळावर आंदोलने (Movement) केली.

कारखाना प्रशासनाने नेहमीच देतो देतो म्हणत पैसेच दिले नाही. त्यानंतर शेतकर्‍यांनी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबधित प्रशासनाला निवेदने देवून उपोषण केले. परंतु शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच पडली. केजीएसकडे पैसे थकलेले असतांना ऊसाचे पैसेच मिळाले नाही त्यामुळे अनेक कुटुंबातील लग्न मोडली. काहींना शिक्षण थांबवावे लागले.

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला परंतू अद्यापही शेतकर्‍यांना पेमेंट मिळाले नाही. केजीएस साखर कारखाना गंगामाई उद्योग समूहाने (Gangamai Industries Group) विकत घेतल्याचे शेतकर्‍यांना समजल्यानंतर शिंगवे येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांनी थकबाकीदार शेतकर्‍यांना एकत्र करत रविवार दि.26 रोजी शिंगवे येथे बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी बोलतांना प्रभाकर रायते म्हणाले की, केजीएस थकबाकीदार शेतकर्‍यांचा एक पैसाही बुडवून देणार नाही. शेतकर्‍यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते मिळविल्या शिवाय आता स्वस्थ बसणार नाही. केजीएस थकबाकीदार शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करून लढा उभा केला जाईल. त्यासाठी थकबाकीदार शेतकर्‍यांनी एकजुटीने संघर्षासाठी तयार राहण्याची गरज आहे.

सध्या मुंबईत कराराची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांच्या थकबाकी संदर्भात नमूद केले आहे की नाही याबाबत संघर्ष समिती माहिती घेईल. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. याप्रसंगी शिंगवे सरपंच योगेश कटारे, रामदास शिंदे, वसंत सानप, कैलास कुटे, संतोष सानप, राजेंद्र रायते, बन्सी नागरे, भाऊलाल कटारे, रामदास सानप, किरण कुटे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.