सर्वसुविधांसह रुग्णालय सज्ज ठेवा : आ. बोरसे

सर्वसुविधांसह रुग्णालय सज्ज ठेवा : आ. बोरसे
Dipak

मुंजवाड । वार्ताहर Munjwad

करोनाबाधितांची संख्या (corona paitent) वाढत असून बागलाण तालुक्यात (Baglan taluka) देखील वाढत असलेले रुग्णवाढ चिंताजनक आहे.

ओमायक्रॉन (omicron) व करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्राणवायूसह (Oxygen) सर्व सुविधा असलेले रूग्णालय आरोग्य यंत्रणेने सज्ज ठेवावे, अशी सूचना करत बागलाणचे आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांनी प्रलंबित प्राणवायू प्रकल्पाचे (Oxygen project) काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.

शहरातील ग्रामीण रुग्णालयास आ. दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी ओमायक्रॉन (omicron) व करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भेट देत रूग्णालयातील सुविधांसह ऑक्सीजन प्रकल्पाची पाहणी केली. ओमायक्रॉन व करोनाने (corona) पुन्हा जिल्ह्यात शिरकाव केला आहे.

बागलाण तालुक्यात देखील करोनाबाधित रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे उपचारासाठी यंत्रणेने सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत आ. बोरसे यांनी व्यक्त केले. यावेळी प्राणवायू प्रकल्प पाहणी दरम्यान प्राणवायू पाईपलाईनचे काम प्रगती पथावर असून तातडीने प्रकल्पाचे काम पूर्ण करून प्राणवायू बेड सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाचा आ. बोरसे यांनी आढावा घेत प्रभारी वैद्यकिय अधीक्षक डॉ. वर्षा अहिरे (Medical Superintendent in charge Dr. It's raining cats and dogs) यांच्याशी चर्चा केली. स्त्री रोग तज्ञ् वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक असतांना वारंवार तो अधिकारी गैरहजर राहात असल्यामुळे गरीब गर्भवती महिलांची प्रसूतीसाठी हेळसांड होत असल्याचे आ. बोरसे यांनी निदर्शनास आणून देत अशा कामचुकार अधिकार्‍यांचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी दिली.

सटाण्यात जिल्हा रुग्णालय (District Hospital in Satana) उभारण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव सादर केला असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. तो मंजूर झाल्यास तालुक्यातील जनतेला त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे आ. बोरसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींनी करोनाला हद्दपार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही आ. बोरसे यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, नगरसेवक राकेश खैरनार, नामपूर बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब भामरे, चंद्रकांत मानकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.