सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा  केदार यांची नियुक्ती
नाशिक

सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा केदार यांची नियुक्ती

Abhay Puntambekar

सिन्नर । विलास पाटील Sinnar

सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा संजय केदार यांची नियुक्ती झाली आहे. केदार यांनी जानेवारी महिन्यात मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता. मात्र, ७ जुलै रोजी त्यांच्या जागेवर तडकाफडकी मनमाडचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसातच करोनाचे संकट देशावर आले आणि देशभर लॉकडाऊन जाहीर झाला. या काळात सिन्नर शहरात चांगले काम करणाऱ्या केदार यांची अचानक पाच महिण्यात बदली झाल्याने त्यावेळी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. विशेष म्हणजे मेनकर यांच्या नियुक्तीचे आदेश निघताना केदार यांना कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता.

या बदलीच्या विरोधात केदार मॅटमध्ये जातील अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह उदय सांगळे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी केदार यांच्या नियुक्तीचे आदेश आज (दि.२३) काढले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com