कसोलीपाडा विकासापासून वंचितच

कसोलीपाडा विकासापासून वंचितच

तांदळाचीबारी । वार्ताहर | Peth

पेठ तालुक्यातील (Peth Taluka) खरशेत ग्रामपंचायत पैकी कसोली पाडा विकासापासून वंचितच असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नुकत्याच चर्चेत असलेल्या खरशेत ग्रामपंचायत माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Former Tourism Minister Aditya Thackeray) यांनी शेंदरीपाडा या पाड्याचा विकासकामांचा आढावा (Review of development works) घेतला. वस्तीतील लोकांना व मुलांना तात्काळ पूल शासन स्थरावरून मंजूर करून दिला.

मात्र याच ग्रामपंचायतरला जोडलेला एक कसोली पाडा अजून विकासापासून वंचितच (Deprived of development) आहे. या गावात पाणी आणण्यासाठी दिड ते दोन कि. मी. चालत जावे लागत आहे. मात्र पावसाळ्याच्या (monsoon) दिवसात गढूळ पाणी प्यावे लागते.

गावात जलवाहिनीव आहे, मात्र नळ कुठेच दिसत नाही. गावात 3 महिन्यापासून सरपंच आला नाही आणि ग्रामसेवक तर येतच नाही, अशी अव्यथा मांडत आमाला पण विकास पाहू द्या, अशी भावना सखाराम पवार, भाऊराम कडू, राजू बोरसे, कांतीलाल गावित यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com