मौजे सुकेणे सरपंच अविश्वास ठराव मंजूर

मौजे सुकेणे सरपंच अविश्वास ठराव मंजूर
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

मौजे सुकेणे (Kasbe Sukene) येथील सरपंच सुरेखा गौतम चव्हाण यांच्या विरोधातील दाखल प्रस्तावावर मतदान (voting) होऊन तो बहुमताने मंजूर झाल्याने सरपंच सुरेखा चव्हाण यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

येथील सरपंच सुरेखा चव्हाण यांचेविरोधात सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव (No-confidence motion) दाखल केला होता. परिणामी त्यावर मतदान (voting) करण्यासाठी मंगळवारी तहसीलदार शरद घोरपडे (Tehsildar Sharad Ghorpade) यांचे अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

परिणामी अविश्वास ठरावाच्या बाजूने व विरोधात मतदान करण्यासाठी गावातील सर्व 1/1/2022 च्या मतदार यादी (Voter list) प्रसिद्धी नुसार ज्या मतदाराचे नाव यादीत आहे त्या सर्वांनी ग्रामसभेला उपस्थित राहणे अनिवार्य केले होते. त्यासाठी सकाळी 8.30 ते 11 या वेळेत मतदारांना मतदानासाठी नोंदणी (Registration for voting) करावी लागली.

3417 मतदारांपैकी 1192 मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केली व नोंदणी केलेल्या मतदारांनी 11 ते दुपारी 4 या वेळेत अविश्वास ठरावाच्या बाजूने किंवा विरोधात मतदान केले. मतदान संपल्यानंतर लगेचच मतमोजणीला (Counting of votes) सुरुवात झाली. यावेळी मतदान नोंदणी झालेल्या 1192 मतदारांपैकी 1116 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरेखा चव्हाण यांच्या विरोधात 576 मते तर समर्थनार्थ 448 मते मिळाली तर 92 मते बाद झाली. परिणामी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सरपंच सुरेखा चव्हाण यांचेविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहिर केले.

या निकालानंतर ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. सरपंच सुरेखा चव्हाण यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव उपसरपंच सचिन मोगल, ग्रा.पं. सदस्य अरुण मोगल, शरद बोंबले, दिलीप चव्हाण, प्रवीण गाढवे, दीपाली झुरुडे, सुनीता मोगल, विमल मोगल, शीला पारधे, निकिता मोगल यांनी आणला. मौजे सुकेणेच्या इतिहासात प्रथमच सरपंच विरोधात अविश्वास ठरावावर मतदान झाल्याने त्याकडे परिसराचे लक्ष लागून होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com