सावधान! कसारा घाटावरील रस्त्याला तडे; वाहने सावकाश चालवा, प्रसंगी मदत घ्या!

सावधान! कसारा घाटावरील रस्त्याला तडे; वाहने सावकाश चालवा, प्रसंगी मदत घ्या!

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गांवरील (Mumbai Agra Highway) कसारा (Kasara) घाटासह पडघा ते गोंदे (Padgha to gonde) दरम्यान महामार्गावर मोठ मोठ्या खड्यांना चुकवत वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे....

त्यातच आता कसारा घाटातील (Kasara Ghat) रस्ताच खचत चालला असून महामार्गांवर (Mumbai Agra highway) काही अंतरावरील रस्त्याला पूर्णता: तडे गेले असून रस्ता दबला गेला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला असलेले संरक्षक कथडे देखील रस्ता सोडून बाजूला सरकुन गेले आहेत.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Agra highway national highway) असलेल्या महामार्गावरील मुंबई नाशिक (mumbai nashik) दरम्यानच्या जुन्या कसारा घाटाची निकृष्ठ दर्जाची झालेली कामे व पडणाऱ्या पावसामुळे कसारा घाटाची पुरती वाट लागली असुन रस्त्याची बिकट वाट बनत चालली आहे.

या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करून टोलनाक्यांवर मात्र वाहन चालकांकडुन पठानी वसुली केली जात आहे. अति महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कसारा घाटात सण. २०२० च्या पावसाळ्यात कसारा जुना घाट व नवीन घाटातील दोन्ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात रस्ता खचला होता. परिणामी काही दिवस महामार्गावरिल वाहतूक एकेरी मार्गाने सुरु ठेवण्यात आली होती. यानंतर पावसाळा संपल्या नंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलप्लाझा कंपनीने एका ठेकेदारा करवी करोड रुपये खर्च करून दोन्ही रस्त्यांचे भरावं करून तडा गेलेला रस्ता व खचलेल्या भागाची दुरुस्ती करून घेतली...

परंतु, हे काम निकृष्टपणे करण्यात आल्याने या वर्षीच्या आठवढया भराच्या आलेल्या पावसामुळे दि. १६ जुलै २२ रोजी जुन्या कसारा घाटात रस्त्याला मोठे तडे गेले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी ज्या ठिकाणी रस्त्याला तडे गेले होते व खचले होते त्याच ठिकाणी रस्त्याला मोठे तडे गेले असून अर्धा किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडा गेला आहे. शिवाय रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी जाळी बांध पद्धतीचे व सिमेंट आर.सी.सी.चे वरच्यावर संरक्षण कथडे संबंधित ठेकेदार व कंपनीने बांधले होते.

ते सुद्धा एक ते दीड फुट खाली दबले गेले आहेत. तर काही कथडे रस्त्याचा एकसंधपणा सोडून बाजूला पडले आहेत. दरम्यान, जुन्या कसारा घाटातील रस्यावरील तडे मोठ्या प्रमाणात वाढत असून घाटातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याला मोठी हाणी पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या सुरु असलेला मुसळधार पाऊस व अवजड वाहनांमुळे महामार्गावरील रस्ता जास्त प्रमाणात खचण्याची शक्यता असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तडा गेलेल्या व खचलेल्या रस्त्यावर उपाययोजना करून एक किमी रस्त्यावर एकेरीच वाहतूक सुरु ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तडा गेलेल्या रस्त्यात पाणी जाऊन भरावं खाचण्याची शक्यता.जुन्या कसारा घाटात रहदारी मोठ्या प्रमाणात असते त्यातच अर्धा कीमी मिटरचा रस्ता खचला आहे. अनेक मोठ्या भेगा या रस्त्यावर पडल्यात. दरम्यान पावसाचे पाणी रस्त्यावर पडलेल्या भेगा व तडे यात जात असुन यामुळे भरावं खचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच तुटलेले संरक्षक कथडे, रस्त्यावरील पडलेले मोठ मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील (Mumbai Nashik highway) वडपे ते गोंदे (Wadape to Gonde) या दरम्यान रस्त्याची चाळण झाली आहे. या खड्यांमुळे अनेक अपघात रोज होत आहेत. कसारा घाटात (Kasara Ghat) खड्यांची रांगोळी आहेच पण कसारा घाटाच्या नागमोडी वळणावर व खोल दरीत वाहने पडण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी असलेले संरक्षण कठडे पूर्णता: तुटून गेले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक हा टोल रस्ता प्रवाशांच्या जीवावरच उठला आहे.

शाम धुमाळ, अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com