कसारा घाटात विचित्र अपघात; नऊ जखमी, चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान

कसारा घाटात विचित्र अपघात; नऊ जखमी, चार ते पाच वाहनांचे मोठे नुकसान

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई-आग्रा (Mumbai Agra Highway) महामार्गावरील नवीन कसारा घाटात (New Kasara Ghat) ब्रेक फेल पॉइंट जवळ एका आयशर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने आयशरने पुढे जाणाऱ्या कार व ट्रकला जोरदार धडक दिली....

धडक दिल्यानंतर आयशर पलटी झाला असुन या अपघातात एक जण गंभीर तर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात झाल्यावर काही वेळाने याच ठिकाणी उतार उतरत असताना स्पीडब्रेकर वर एक कंटेनरने सलग चार वाहनांना धडक दिली.

यात सहा महिला किरकोळ जखमी झाल्या असून महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे व पोलीस पथक यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी झालेल्या नागरिकांना नरेंद्र महाराज रुग्ण संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com