हरसूल : दहा एकरावर फुलविली करटोल बाग

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उंबरदरी येथे यशस्वी प्रयोग
हरसूल : दहा एकरावर फुलविली करटोल बाग
करटोल बाग

हरसूल | देवचंद महाले

विज्ञान तंत्रज्ञानाच्या अवगत प्रगतीमुळे दुर्गम (ग्रामीण) भागात दिवसेंदिवस शेती बदलांचे वारे वाहू लागले आहेत. शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत उत्पादन वाढीच्या शेतीकडे वळला आहे. याचेच उदाहरण म्हणजे दुर्गम भागातील उंबरदरी येथे तब्बल दहा एकरावर शेतकऱ्याने करटोल बाग फुलवून उत्पादन वाढीच्या शेतीवर दिलेला भर होय.

उंबरदरी (ता.त्र्यंबकेश्वर) येथे व्यसनमुक्तीचे देवदूत आणि नावारूपास असलेले गाडगे महाराज उर्फ जगन्नाथ जाणू चौधरी होय. त्यांनी परराज्यातुन करटोल बी आणून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. उंबरदरी गावालगत तसेच कौलपौंडा शिवारातील म्हसनवटी माळात तब्बल दहा एकरावर करटोल बाग फुलविली आहे.

आजपर्यंत ह्या शेतकऱ्याला दोन लाखाहुंन अधिक नफा झाला असून त्यांना अजून सात लाख रुपये अपेक्षित आहेत. ग्रामीण भागात फुललेली ही करटोल बाग पाहण्यासाठी सर्वसामान्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असून मार्गदर्शन घेत आहेत.

बी प्रक्रियेतून उत्पादन वाढ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी करटोल सारख्या शेती पध्दतीचा वापर करावा. यासाठी उंबरदरी येथील करटोल बागेत परिपक्व (पिकलेली) करटोल पासून जागेवरच बी प्रक्रिया करण्यात येत आहे. जगन्नाथ चौधरी उर्फ गाडगे महाराज यांनी प्रत्येक्ष रित्या काम हातात घेतले असून परिसरातील शेतकऱ्यांच्या काळानुसार बदलत्या शेतीचा आलेख उचावण्याचे स्वप्न मनाशी बाळगून आहेत.

जून महिन्याच्या प्रारंभी करटोल पिकाची लागवड करण्यात आली आहे. या लागवडीमुळे स्थानिकांना या करटोल बागेमुळे दोनशे पन्नास रुपये प्रतिदिन दहा रोजगारांना मजुरी मिळत आहे. यामुळे करोना काळातील उपलब्ध झालेली ही मजुरी कुटुंबाला आर्थिक घडी बसवीत असल्याचे मजूर नामदेव चौधरी, रामू पवार, रामनाथ महाले यांनी सांगितले.

उंबदरी येथील करटोल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे व यातून लाखो रुपयांचा नफा मिळवावा. तसेच परंपरागत शेतीला फाटा देत अवगत तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी यासारख्या माळरानावरील शेतीचा अवलंब करत उत्पादन वाढीवर भर द्यावा हाच या मागील उद्देश आहे.

- जगन्नाथ चौधरी

येथील करटोल शेतीला प्रत्यक्षरीत्या भेट दिली असता डोळ्याचे पारणे फिटले जाते. जिद्द, चिकाटी, मेहनत तसेच माळरानावर टप्प्याटप्प्याने फुललेली करटोल बाग आणि लगडलेली करटोल मन वेधून घेत आहे. याचा अभिमान तर वाटतोच पण इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेण्यासारखे आहे.

- भारती ताई खिरारी, सरपंच, भूतमोखाडा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com