कार्तिक स्वामी महोत्सव रद्द

पोलिसांनी परवानगी नाकारली
कार्तिक स्वामी महोत्सव रद्द

पंचवटी । वार्ताहर Panchavati

काशी नाट्टकोटीईनगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीच्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात Shri Kartik Swami Temple होणारा कार्तिक स्वामी महोत्सव रद्द करण्यात आला आहे. यावर्षीही पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने गुरुवारी (दि.18) शनिचौक परिसरातील या मंदिरात भाविकांविना हा उत्सव साजरा करण्यात आला. बंद मंदिरात पुजारी व विश्वस्त यांच्या उपस्थितीत सर्व पूजाविधी व अभिषेक करण्यात आले. सकाळी तुरळक भाविक मंदिरात आले असले तरी दुपारनंतर मंदिर भाविकांना बंद करण्यात आल्याचे चित्र होते.

पंचवटीतील शनिचौक Panchavati Shani Chowk परिसरातील प्रसिद्ध कार्तिक स्वामी मंदिरात यावर्षीही महोत्सवासाठी तयारी केली होती. कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राला होणार्‍या पूजा व अभिषेक यांच्या संदर्भातील पत्रकेही प्रसिद्ध करण्यात आले होते. या सोहळ्यास भाविकांची दर्शनासाठी व मोरपीस अर्पण करण्यासाठी गर्दी होत असल्याने त्याच्या आयोजनासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे विश्वस्तांनी परवानगी मागितली होती.

करोनाचा वाढता धोका लक्षात घेता पोलीस प्रशासनाने या उत्सवास परवानगी नाकारली असल्याचे समजते. असे असले तरीही गुरुवारी श्रींच्या मूर्तीला दुपारी 12 वाजता तीळ, तेल, मध, दही, तांदूळ पीठ, हळद, चंदन, तूप, मोसंबीचा रस, उसाचा रस, नारळपाणी, डाळिंबाचा रस, संत्री रस, जल आदींचा अभिषेक करण्यात आला.

शुक्रवारी (दि.19) दुपारी 2 वाजून 28 मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असून शुक्रवारी रात्री 1 वाजून 29 मिनिटांपासून ते शनिवारी (दि.20) पहाटे 4 वाजून 29 मिनिटांपर्यंत कृत्तिका नक्षत्र असल्याने या मुहूर्तावर मंदिरातील पुजार्‍यांच्या हस्ते पूजाविधी व अभिषेक करण्यात येणार आहे. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी मंदिर परिसरात बॅरिकेडस् लावून येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com