
नाशिक | Nashik
कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था व श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख, नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष, लोकनेते कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर राज्यस्तरीय नाशिक भूषण पुरस्कार २०२२ /२०२३ ची घोषणा आज करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बर्वे,कार्याध्यक्ष संजय करंजकर, पतसंस्थेचे चेअरमन अमोल बर्वे यांनी आज पत्रकार परिषेदत ही माहिती दिली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश बर्वे यांनी सांगितले की संस्थेच्या वतीने गेल्या २६ वर्षापासून आदर्श नगरसवेक, सहकार, शैक्षणिक, शासकीय, सामाजिक, साहित्यिक, वैद्यकीय, आदी. क्षेत्रात राज्य पातळीवर विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा योगदानाबद्दल गौरव केला जातो.
यंदाच्या नाशिक भूषण पुरस्कारा मध्ये जेष्ठ समाजसेवक पां.भा.करंजकर यांना जीवन गौरव तर महाराष्ट्रतील आदर्श आमदार म्हणुन पारनेरचे निलेश लंके, नाशिक नगरीचे आदर्श नगरसेवक म्हणून राजेंद्र महाले, जयश्री खर्जुल, पत्रकारितेकरीता टीव्ही ९ न्यूजचे चीफ रिपोर्टर चंदन पुजाधिकारी, सतीश दशपुत्रे (त्रंबकेश्वर), उदयोजक म्हणून गिरीश पालवे, राजेंद्र पानसरे ,अजय सांगळे ,सागर विंचू , सहकार क्षेत्रातील योगदाना बद्दल रावसाहेब मोरे.
तसेच, वैद्यकीय मध्ये डॉ.प्रतिभा औन्धकर , डॉ.शरद पाटील, डॉ.राजेंद्र बोरसे, कृषी क्षेत्र बापूसाहेब पिंगळे, राम सुरसे (वावि) विधी तज्ञ ऍड.मुकुंद ढोरे तर सामाजिक क्षेत्रातून स्वाती जाधव,अनुपकुमार जोशी, भास्कर दिंडे, विनोद केकाण , शैक्षणिक क्षेत्रात रियाज सय्यद, प्रा.अशोक मोरे, श्रीमती ज्योस्तना पाटील, सांस्कृतिक कार्याबद्दल सुप्रसिद्ध शिव साम्रज्य ढोलपथक संस्था तर शैक्षणिक कार्यात शतक मोहत्सव साजरा करणारी नाशिक एज्युकेशन सोसायटी, व अमृत महोत्सव साजरे करणारी शंकर एज्युकेशन सोसायटी देवळली कॅम्प या संस्थांचा गौरव केला जाणार आहे.
दरम्यान, गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराची निवड मधुकर झेंडे, प्रा.यशवंतराव पाटील, संजय गीते, पद्माकर पाटील, प्रशांत कापसे, कवी प्रा.रवींद्र मालुंजकर या निवड समितीने केली. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन दत्तात्रय वळे, रमेश शिरसाठ, विशाल संधान, राहुल बर्वे, रमेश पवार, प्रवीण गोसावी उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती गणेश बर्वे ,संजय करंजकर यांनी दिली.