कर्मयोगिनी पुरस्कार चांगली संकल्पना : डॉ. पवार

कर्मयोगिनी पुरस्कार चांगली संकल्पना : डॉ. पवार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

कर्मयोगिनी पुरस्कार ( Karmayogini Puraskar ) ही चांगली संकल्पना आहे. सर्व तळागाळातल्या महिलांनी अशाच प्रकारे प्रयत्न करून कुटुंब, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य व देश पुढे न्यावा. महिलांनी जास्तीत जास्त संघटन करून लघुउद्योग तसेच इतर उद्योगाकडे वळावे. प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबाला एकसंघ करून देशासाठी काहीतरी काम करण्याची काहीतरी करून दाखवण्याची जबाबदारी उचलावी व स्वतःला सक्षम करावे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री .डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले.

क्रिशा फाऊंडेशन ( Krisha Foundation ) प्रायोजित कर्मयोगिनी पुरस्कार 2022 या पुरस्काराने दिंडोरी शहरातील विविध स्तरांतील सामान्य नागरिकांमधील महिला ज्यांनी आपल्या कर्माने, कर्तुत्वाने कुटुंब व समाजासमोर एक आदर्श ठेवला अशा दहा कर्मयोगिनींना डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, शहराध्यक्ष शामराव मुरकूटे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, नगरसेविका अरुणा देशमुख, आशा कराटे, प्रज्ञा वाघमारे, रचना राजे, डॉ. प्रियांका कासलीवाल, रणजित देशमुख, भास्कर कराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक क्रिशा फाऊंडेशन अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.उज्वला कोथळे उगले यांनी केले. यावेळी क्रिशा फाऊंडेशन अध्यक्षा उज्वला कोथळे उगले यांनी सांगितले की, क्रिशा फाऊंडेशनच्या माध्यमातून तळागाळातल्या महिलांनी केलेल्या कर्तुत्वाचा उल्लेख कुठेतरी व्हायला हवा. सन्मान कुठेतरी व्हायला हवा म्हणून हा कर्मयोगीने पुरस्कार चे वितरण करण्यात आले आणि या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येक वर्षी मोठे होत जाणार आहे असे प्रा. उज्वला कोथळे उगले यांनी सांगितले.

यावेळी सरला कोकाटे (महिला सक्षमीकरण), अनिता मवाळ (भाजी विक्रेता), भारती लांडे (अंगणवाडी सेविका), डॉ. निता बुरड (वैद्यकीय सेवा क्षेत्र), अंजना जाधव (सामाजिक संघटन), सुशिलाबाई पगारे (सफाई कामगार), शभिम शेख (मेस व्यवसाय), कविता बैरागी (परिचारीका), सौ. विरकर (शैक्षणिक क्षेत्र), जयश्री म्हैसधुणे (फुल विक्रेत्या) आदींना सन्मानपत्र देवून राज्यमंत्री डॉ. भारती पवार व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अरुणोदय सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सुरेखा धुळे व वैशाली बोरस्ते यांचाही केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांच्या ंहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी लक्ष्मण गायकवाड, नरेंद्र जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सारंग घोलप यांनी डॉ. भारती पवार यांचे रेखाचित्र भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.जगदिश साळुंखे, सौ.शर्मिष्ठा जोशी यांनी केले तर आभार भाजप सरचिटणीस तुषार वाघमारे यांनी केले. कार्यक्रमास विशेष महिलांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com