Kargil Vijay Diwas 2022 : जरा याद करो कुर्बानी...

पिंगळवाडेत शहीद जवानांना मानवंदना
Kargil Vijay Diwas 2022 : जरा याद करो कुर्बानी...

पिंगळवाडे | Pingalwade

1999 साली कारगिल या परिसरात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात (India-Pakistan War) वीरमरण आलेल्या सर्व शहीद जवानांना पिंगळवाडे (Pingalwade) येथे मानवंदना देण्यात आली...

कारगिल विजय दिनाच्या औचित्याने पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली व 'शहीद जवान अमर रहे'च्या घोषणा दिल्या.

Kargil Vijay Diwas 2022 : जरा याद करो कुर्बानी...
Video : नाशकात उद्यापासून 'रानभाज्या महोत्सव'

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा प्रांगणात ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडला. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन केदा भामरे यांनी अर्पण केला.

तसेच गावातील नागरिक गंगाधर भामरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास नारळ वाढवण्यात आले. तसेच वीर जवान कुलदीप नंदकिशोर जाधव यांच्या स्मारकास पुष्पहार वीर माता नीता जाधव व वीर पिता नंदकिशोर जाधव यांनी मानवंदना देत पुष्पहार अर्पण केला. शहीद कुलदीप जाधव या वीर हुतात्म्याच्या आठवणी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

कारगिल युद्धात आपली मोलाची कामगिरी बजावणारे पिंगळवाडे येथील माजी सैनिक उत्तम शिवराम भामरे यांनी युद्धकाळात घडलेल्या बहुतांश घटनांवर आपल्या आठवणी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. तसेच त्यांनी शहीद जवानांना मानवंदना देत आपले मनोगत व्यक्त केले.

Kargil Vijay Diwas 2022 : जरा याद करो कुर्बानी...
नाशकात काँग्रेसचा 'सत्याग्रह'

यावेळी भीवसन कापडणीस, दीपक कापडणीस, संदीप भामरे, जितेंद्र भामरे, उत्तम भामरे, महेश गांगुर्डे, किरण सावकार, नसरुदिन शेख, विरपत्नी कल्पना रौंदळ, संजय भामरे, कृष्णा भामरे, नाना बागुल, केवबा भामरे, गणेश बोरसे, सुनील भामरे, सचिन भामरे, दीपक भामरे, धर्मराज भामरे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com