जेव्हा गोदाकाठच्या करंजगावातील घरात बिबट्या शिरतो...

जेव्हा गोदाकाठच्या करंजगावातील घरात बिबट्या शिरतो...

नाशिक| प्रतिनिधी

वेळ दुपारी बारा वाजेची...ठिकाण निफाड तालु्नयातील करंजगाव... एक बिबट्या भक्षाच्या शोधात थेट गावातील एका घरात शिरतो.सुदैवाने घरात कोणी नसते, मात्र बिबट्या घरात शिरल्याल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरते, अन गावातील नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण होते. वनविभागाला माहिती मिळताच अधिकारी रेस्न्यु पथकासह घट्नास्थळी दाखल होतात. यावेळी बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी सुरु होतो, बिबट्या अन वनकर्मचार्‍यांचा संघर्ष, यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी थेट ट्रॅ्नयुलायजेश्न देउन बेशुद्ध केले जाते. यानंतर गावकरी सुट्केचा निश्वास सोड्तात. थांबा.गावात खरोखर बिबट्या शिरला नाही तर वनविभागाने बिबट्याचा मॉकड्रील (प्रात्यशिके) घेतला....

मानवी वस्तीत बिबट दिसल्यानंतर होणारा संघष टाळणे, बिबट्याचा बचाव करणे व कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता नाशिक वनवृत्ताच्या पूर्व विभागाकडून मंगळवारी (दि. 22) हे मॉकड्रील घेण्यात आले.

गावात वनविभागाचे अत्याधुनिक असलेले रेस्क्यू पथक, पोलिसांची मोठी कुमक आल्याने गावात बिबट्या शिरल्यासारखी परिस्थिती होती, काही गावकर्‍यांनाही तेच वाटले. मात्र, बिबट्याला कसे पकडले जाते याचे प्रात्यक्षिके दाखविले जाणार असल्याचे वनविभागाने ग्रामस्थांना सांगितल्याने तेव्हा कुठेतरी सुट्केचा निश्वास टाकला.

यावेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान या भागात उस हे मुख्य पीक असल्याने मागील काही वर्षापासून बिबट्याचे मानवावर हल्ले होण्याच्या घट्ना घड्त आहे. तसेच शेतातही बिबट्या आढ्ळून येत असल्याने शेतकर्‍यामध्ये भीतीचे वातावरण दिसून येते.

जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठ्कीत वन्यप्राणी व मानव संघष र्हाताळ्ण्याकरिता बिबट प्रवण संवेदनशील गावांमध्ये वनविभाग, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते.

त्यानुसार मंगळ्वारी बिबटयाचे हे प्रात्यक्षिके घेण्यात आले. पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिके घेण्यात आले.

विभागीय वनअधिकारी स्वप्नील घुरे, मनमाडचे सहाय्यक वनसंरक्षक डॅा. सुजित नेवसे, पोलीस निरीक्षक सानप, स.पो.नि आशिष आड्सूळ्, वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख, आदीसह वन्यजीव रक्षक, कर्मचारी यांनी यशस्वीपणे हे अनोख़े मॉकड्रील केले. गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटीलसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com