सभागृह नेते कमलेश बोडके यांचे मनपा आयुक्तांना पत्र

सभागृह नेते कमलेश बोडके यांचे मनपा आयुक्तांना पत्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेत NMC भारतीय जनता पक्षाची BJP एक हाती सत्ता असून सुद्धा अधून-मधून घरचा आहेर मिळत असतो, आता महापालिकेतील सभागृह नेते कमलेश बोडके Kamlesh Bodke यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव NMC Commissioner Kailas Jadhav यांना प्रस्तावित उड्डाणपु लाच्या Proposed Flyover works कामा संदर्भात अनियमित असल्याचे सांगत याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल Trimurti chowk to Mico Circle Proposed Flyover दरम्यान बांधण्यात येणा-या दोन उडडाणपुलाच्या बांधकामातील अनियमितेबाबत बोडके यांनी मनपा आयुक्तांना आज निवेदन सादर केले. सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च असणार्‍या बांधण्यात येण्या-या दोन्ही उडडाणपुलाच्या चुकीच्या पध्दतीने राबविण्यात आलेल्या सिमेटसह अन्य साधनसामुग्रीवर स्टार रेट लावल्यामुळे तीनशे कोटीच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने मनपाचा मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे, या दोन्ही उड्डाणपुलाची मुळ निविदा प्रक्रिया विशिष्ट ठेकेदाराला काम देण्यासाठी राबविली गेल्याचा संशय मनपा वर्तुळात निर्माण झालेला आहे. असे बोडके यांनी निवेदनात म्हटले आहे.

त्याचप्रमाणे दि.28 जाने 2021 रोजी मनपास फक्त दोन निविदा प्राप्त झालेल्या होत्या, या निविदा प्रक्रीयेस मुदतवाढ दिली असती तर तूलनात्मक स्पर्धा होवून अनेक बांधकाम क्षेत्रातील ज्या कंपन्यांना अनुभव आहे अशा कंपन्या सहभागी झाल्या असत्या परीणामी प्राकलन दरापेक्षा कमीदर व गुणवत्ता प्राप्त कंपनीला कार्यरंभ आदेश देता आला असता, मात्र जी प्रक्रीया जाणिवपूर्वक टाळण्यात आल्याने बांधकाम विभागाचे कार्यालयीन कामकाज संशायास्पद आहे.

स्पर्धात्मक पध्दतीने आणखी मक्तेदारांना निविदा प्रक्रियेत सहभागी करण्याचे सोडून एका विशिष्ट मक्तेदाराला कार्यारंभ आदेश दिल्याने व मक्तेदाराने आपल्या सोयीने मुळ निविदेमध्ये बदल केल्याने एम 40 ऐवजी 60 या प्रतीचे सिमेट वापरण्याचे कारण देत मोठया प्रमाणात फेरबदल करण्याचा घाट घतला आहे. सदरची बाब मनपाचे मोठयाप्रमाणात आर्थिक नुकसान करणारी आहे. असा आरोप बोडके यांनी केला आहे.

तसेच एम 40 ऐवजी 60 या प्रतीचे सिंमेट वापरण्याने कामी काही अशासकिय ठरावान्वये मक्तेदारास साथ देत असून मनपाचे अधिकारी व सेवक तसेच पदाधिकारी व मक्तेदार हे संगनमताने आर्थिक उलाढाल करून मनपाचे आर्थिक नुकसान करीत आहे. उडडाणपुलाचे तांत्रिक सल्लागार यांनी संबंधित काँक्रिट ग्रेड योग्य असल्याचा अभिप्राय दिला असतांनाही केवळ मक्तेदाराच्या अट्टहासाकरिता एम-60 ग्रेडचे सिंमेट वापरण्याचा निर्णय घेतला जात आहे. जर एम-45 ग्रेड सिंमेंटमुळे उडडाणपुलास तडे जाणार असतील तर संबधित मक्तेदार यांनी प्रि बीड बैठकीत आक्षेप का घेतला नाही. असा प्रश्न उपस्थित केला आहे.

नाशिक महानगरपालिका, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल ते सिटी सेंटर मॉल पर्यतच्या बांधण्यात येणा-या उड्डाणपुलाचा निविदे प्रक्रियेपासून कार्यारंभ आदेशापावेतो कार्यालयीन कामकाज प्रक्रिया अत्यंत संशयास्पद आहे. या कामाची संपूर्ण सखोल चौकशी करण्यात येवून दोषी अधिकारी, कर्मचारी व मक्तेदार यांचेवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई व्हावी.

- कमलेश बोडके, सभागृह नेता, मनपा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com