
सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar
औद्योगिक कामगार (Industrial workers) हे तालुक्याच्या, जिल्ह्याच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा (backbone of the economy) आहेत. शासनाने त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या असून
या कामगारांच्या कल्याणासाठी प्रशस्त जागेवर ईएसआयसी रुग्णालयाबरोबरच (ESIC Hospital) महाराष्ट्रातातील (maharashtra) भव्य कामगार भवन (Kamgar Bhavan) उभारण्याचे आश्वासन आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांनी दिले.
नाशिक वेस (Nashik Wes) येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Kamgar Kalyan Mandal) कार्यालयाचे गोजरे मळा येथील सुरभी मित्र मंडळाच्या सभागृहात स्थलांतर करण्यात आले असून या नविन जागेत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आ. कोकाटे बोलत होते. कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इळवे (Commissioner of Workers Welfare Board Raviraj Ilve) अध्यक्षस्थानी होते.
व्यासपिठावर नाशिक विभागाच्या सहकल्याण आयुक्त भावना बच्छाव (Bhavana Bachhav, Joint Commissioner, Nashik Division), कामगार उपायुक्त विकास माळी, स्टाईसच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा माळोदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, गोविंद लोखंडे, बाळासाहेब उगले उपस्थित होते.
कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्या विविध योजनांसाठी कामगारमंत्री हसन मुश्रीफ (Labor Minister Hassan Mushrif) यांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी (fund) उपलब्ध करून दिला जाईल. त्या माध्यमातून कामगारांच्या महिलांसाठी रोजगार निर्माण करणारे उपक्रम राबविण्याचे आवाहन कोकाटे यांनी केले. या भागातील बालकांची गैरसोय दूर करण्यासाठी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबरोबरच नवीन खोली बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शासन व प्रशासनाने एकत्रित काम केल्यास कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ कामगारांना देता येईल असे ईळवे म्हणाले. सिन्नरच्या कामगार कल्याण मंडळात विद्यार्थ्यांसाठी रिडींग हॉल आणि सुसज्ज ग्रंथालय देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. माळोदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन किरण भावसार यांनी करीत कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाच्या स्थलांतरणासाठी आ. कोकाटे यांनी तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विठ्ठल उगले यांनी प्रास्ताविक केले.
कामगार प्रतिनिधी हरीभाऊ तांबे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णा भाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली’ यासह छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) पोवाडा शाहीर स्वप्निल डुंबरे यांनी सादर करत उपस्थिांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख अनिल बोरसे, किरण गोजरे, अनिल कर्पे, प्रा. राजाराम मुंगसे, देविदास खताळे, अनिल जगताप, भारत सोनवणे, शिवाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.