कळवणनामा: 13 वर्षात बाजार समितीचा कायापालट

कळवणनामा: 13 वर्षात बाजार समितीचा कायापालट

कळवण | किशोर पगार | kalwan

खर्‍या अर्थाने गेल्या 13 वर्षात कळवण बाजार समितीच्या (Kalwan Market Committee) उत्पन वाढ झाली असून विविध विकास कामे हि झाली आहे. बाजार समिती अंतर्गत शेतकर्‍यांसाठी (farmers) विविध सु सुविधा उपल्बध झाल्या आहेत. सन 2008 साली सभापती धनंजय पवार (Dhananjay Pawar) यांनी बाजार समितीचे सूत्र हाती घेतल्यानंतर बाजार समितीचा कायापालट झाला असल्याचे मत शेतकर्‍यांनी व्यक्त केले आहे.

कळवण कृषी उत्पन बाजार समितीची स्थापना 1971 साली झाले असले तरी प्रत्यक्षात कामकाज 1975 पासून सुरु होऊन 2004 साली कळवण (kalwan)- देवळा (deola) बाजार समितीचे विभाजन होऊन खर्‍या अर्थाने कळवण बाजार समिती अस्तित्वात आली असली तरी स्वतंत्र बाजार समितीचे लोकनियुक्त संचालक मंडळ 2008 साली अस्तित्वात येऊन बाजार समितीची विकासकडे वाटचाल सुरु झाली. त्या आधी मुलभूत सुविधा पासून बाजार समिती वंचित होती, मात्र गेल्या 13 वर्षात बाजार समितीने कात टाकली आहे.

1 मार्च 1971 सटाना बाजार समिती म्हणून कळवण बाजार समिती उदयास आली, परंतु 1975 साली कळवण- देवळा हि एकत्रित बाजार समिती प्रत्यक्षात अस्तित्वात येउन कळवण येथून बाजार समितीचा कामकाजास सुरुवात झाली. कळवण - देवळा तालुक्याचे विभाजन झाल्यांनतर काही वर्षात म्हणजे 2004 साली कळवण व देवळा ह्या स्वतंत्र्य बाजार समिती सुरु झाल्या. 2004 पासून 2008 पर्यंत बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशसकीय मंडळ कार्यान्वित होते. या प्रशासकीय मंडळ नियुक्तीवरून कळवण तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली गेली असो ह्या लेखाचा तो भाग नाही.

2008 साली बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होऊन जि. प. सदस्य रवींद्र देवरे व जिल्हा बँक संचालक धनंजय पवार यांचे नेतृत्वाखालील पॅनल सत्तेवर आले तर व्यापारी गटातील दोन उमेदवार विरोधी गटाकडून निवडून आले, परंतु प्रभावी विरोधक नसल्याने धनंजय पवार यांची एकहाती सत्ता बाजार समितीवर आली व विभाजन झाल्यानंतर पहिलेच लोकनियुक्त संचालक मंडळ कार्यांन्वित झाले. येथूनच बाजार समितीची विकासाकडे घोडदौड सुरु झाली. कळवण बाजार समिती अंतर्गत अभोणा उपबाजार समिती मध्ये कोठयवधी रुपयाची रोज उलाढाल होत असून त्या ठिकाणी शेतकर्‍यांसाठी सुविधा देण्यात आल्या आहे.

उपबाजार समिती अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण पाईप गटार कार्यालयाची इमारत बांधकाम इतर विकास कामे करण्यात आली असून उर्वरित विकास कामे गरजेचे बनले आहे. तसेच कनाशी उपबाजार समिती मध्ये एक हेक्तर जमीन खरेदी करण्यात आली असून जमीन सपाटीकरण व भुईकाटा उभारणी करण्यात आली आहे. 152 गावे, 42 सहकारी सोसायटी, 87 ग्रामपंचायत ह्या बाजार समितीत सामाविस्थ आहे. 70 व्यापारी व इतर घटकांना लायसेन्स दिले आहेत बाजार समितीत 32 मापाडी व 80 हमाल कार्यरत आहेत.

बाजार समितीत 44 शेतीमालाचे नियमन करण्यात आले असून कळवण मुख्य यार्ड, नाकोडा कांदा मार्केट, अभोणा , कनाशी उपबाजार येथे समितीने अत्यावशक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. गेल्या 13 वर्षात मुख्य बाजार आवारात अंतर्गत कॉक्रीटीकरण, शेतकरी निवास नुतनीकरण, गटार, प्रवेशद्वार गेट, वाचमान केबिन, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात आली. नाकोडा कांदा मार्केट येथे काम्पौंड वाल, भुईकाटा, शेतकरी निवास, उपहार गृह, अंतर्गत रस्ते, जमीन सपाटीकरण, समिती ऑफिस आदी कामे केली आहे. 2008 ते 2021 ह्या काळात बाजार समितीने उत्पन व नफा यात मोठी मजल मारल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com