कळवण वार्तापत्र: विहिरींनी गाठला तळ; अन कांद्याला बसली झळ

कळवण वार्तापत्र: विहिरींनी गाठला तळ; अन कांद्याला बसली झळ

कळवण | किशोर पगार | Kalwan

मागील काही आठवड्यांपासून प्रचंड उन्हाचा तडाखा (heat of summer) वाढल्याने अचानक विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे उशिरा लागवड झालेल्या कांद्याचे क्षेत्र (onion sector) पाण्याअभावी अडचणीत आले आहे. चणकापूरच्या आवर्तनावरच पुढील भवितव्य ठरणार आहे.

‘कसमादे’ पट्ट्यात मजूर टंचाई (Labor shortage), दुबार पेरणी यामुळे उशिरा लागवड झालेल्या कांद्याला आता शेवटच्या टप्प्यात एक दोन पाण्याची नितांत आवश्यकता आहे. शेवटच्या पाण्यावरच कांद्याची फुगवण क्षमता अवलंबून असते. मात्र मागील महिन्यापासून तापमानात (Temperature) अचानक वाढ झाल्याने पिकाचे दोन पाण्यातील अंतर कमी होऊन आठ तास चालणारे पाणी आता जेमतेम एक दोन तासावरच आले आहे. त्यामुळे उशिरा लागवड झालेले कांद्याचे क्षेत्र पाण्याअभावी सोडून देण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे.

फक्त कांदाच नव्हे तर मिरची (Chili), टोमॅटो (Tomatoes) आदी पिकांवर प्रचंड उष्णतेमुळे फुलगळ होत नसून, दिवसाआड पाणी देण्याची निकड वाढली आहे. कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी आदी भाजीपाला (Vegetables) देखील पाण्याअभावी धोक्यात आला आहे. कांदे पिकानंतर शेतकर्‍यांचे (farmers) पुढील पिकाचे नियोजन ही कोलमडले आहे. आधीच अवकाळी पावसाच्या फटक्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढला. अतिरिक्त फवारणी खर्च करून कशीबशी पिकं जगवलीत. मात्र सध्या विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याअभावी ही पिके सोडुन देण्याची वेळ ओढवली आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने भाजीपाला (Vegetables), कांद्याचे पीक होरपळू लागले आहे. सतत पाणी देणे गरजेचे असतांना ऐन पीक बहरणीच्या वेळीच विहिरींनी तळ गाठल्याने शेतकर्‍यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. आता चणकापूर (Chanakapur), अर्जुनसागरच्या आवर्तनाकडे ’कसमादेकरांची’ आस लागून राहिली आहे. धरणातही पाण्याचा मुबलक साठा आहे. पूर्णक्षमतेने वेळेत हे आवर्तन सुरू झाल्यास हजारो एकराच्या पिकांना संजीवनी मिळणार आहे.’कसमादे’ पट्ट्यातील काही ग्रामपंचायतींनी आवर्तनाबाबत निवेदन (memorandum) दिले आहे.

लवकरात लवकर हे आवर्तन सोडावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे. यावेळी कळमथे येथील कांदा उत्पादक गौरव वाघ यांनी सांगितले की, शेतातील विहिरींच्या पाण्याचा साठा पूर्णपणे बंद झाला असून, नदीपात्रालगतच्या विहिरीही जेमतेम तासभारच चालत आहेत. त्यामुळे शेवटच्या पाण्यावर अवलंबून असणारे कांद्याचे क्षेत्र अडचणीत आले आहे. चणकापूर, अर्जूनसागरचे आवर्तन लवकरातलवकर सोडले तरच कांद्याचे पीक हाती येऊ शकते असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com