कळवण वार्तापत्र: मेनरोडच्या थंडावलेल्या कामामुळे कळवणवासीय त्रस्त

कळवण वार्तापत्र: मेनरोडच्या थंडावलेल्या कामामुळे कळवणवासीय त्रस्त

कळवण | किशोर पगार | Kalwan

गेल्या तीन वर्षांपासून कळवण (kalwan) शहरातील मुख्य रस्ता असलेल्या मेनरोडचे काम संबंधित ठेकेदाराकडून संथगतीने सुरु आहे.

अवघ्या एक किलोमीटर रस्त्यावर कॉक्रीटीकरण (Concreting on the road) करतांना होणारा विलंब हा येथील व्यावसायिकांवर अन्याय करणारा ठरत आहे. त्यामुळे कळवणवासीय, व्यापारी, नागरिक त्रस्त झालेले असून कळवण येथील मुख्य मेनरोड (main road) ही कळवण वासीयांची मुख्य समस्या बनली आहे. त्यामुळे कळवणवासीय त्रस्त झालेले आहेत.

मेनरोडच्या अर्धवट अवस्थेतील कामामुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, वेळोवेळी अपघात होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सार्वजनिक बांधकाम खाते (Public Works Department) व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी उघड्या डोळ्यांनी बघत असतांना व्यापारी वर्ग आक्रमक झाला.कळवण च्या व्यापारी वर्गाला पहिल्यांदाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचे पाहून सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक (Corporator), शेतकरी (farmers), ग्रामस्थांनी या आंदोलनाला (agitation) पाठींबा दिला होता.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड (Sub-Divisional Police Officer Amol Gaikwad), तहसीलदार बंडू कापसे (Tehsildar Bandu Kapase), माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, रवींद्र देवरे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या साक्षीने ठेकेदार व संबंधित यंत्रणेची महत्वपूर्ण बैठक होऊन 45 दिवसात गुणवत्ता राखत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले होते.

रास्ता रोको आंदोलनात शहरातील सर्वच व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी महासंघाचे संचालक दिपक महाजन, महाराष्ट्र चेंबर्सचे विश्वस्त विलास शिरोरे, विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार, माजी जि. प. सभापती रवींद्र देवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, हेमंत पाळेकर, बेबीलाल संचेती, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडून या आंदोलनाचे(agitation) समर्थन केले होते. परंतु आज दोन ते तीन महिने उलटूनही ह्या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून संबंधित ठेकेदाराने कळवणकर जनतेची आशा फोल ठरविली आहे.

कोविड काळामुळे यापूर्वीच आर्थिक विवंचनेत सापडलेला लहान,मोठा व्यापारी या रस्त्याच्या थंडावलेल्या कामामुळे आर्थिक व शारीरिक ही बेजार झाला आहे. अनेकांना फुफुसांचे आजार जडले आहे. रस्त्याच्या कामाची पद्धत पाहता स्थानिक व्यावसायिकांना आता आत्महत्या (Suicide) करण्याची वेळ आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून होणार्‍या विलंबाबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी वेळोवेळी आमदार (MLA), खासदार (MP), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) अधिकार्‍यांना कळविले आहे. त्यावरून काही दिवस काम सुरू होते तर अनेक दिवस ते विविध कारणांनी पुन्हा बंद पडते.

सार्वजनिक बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराकडून हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने येथील व्यापारी संतप्त झाले आहेत. कळवणच्या व्यापारी बांधवांनी सतत सर्वच पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या हाकेला ओ देत कळवण (kalwan) बंद 100 टक्के यशस्वी केला होता. याची जाणीव ठेवून कळवण चे सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामस्थ, शेतकरी (farmers) बांधव व व्यावसायिक सर्व घटक या हक्काच्या लढाईत सहभागी झाले होते. यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष जयंत देवघरे, प्रकाश पाटील, रंगनाथ देवघरे, कुमार रायते, श्रीकांत मालपुरे, विजय बधान, नितीन वालखेडे, चंद्रकांत कोठावदे, लक्ष्मण खैरणार, संदीप पगार, कैलास पगार, सागर खैरनार, उमेश सोनवणे, भरत आहिरे,

रुपेश शिरोडे, गजानन सोनजे, हेमंत कोठावदे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील, भाजपचे सुधाकर पगार, डॉ. अनिल महाजन, छावा तालुकाध्यक्ष प्रदीप पगार, माकपचे मोहन जाधव, टिनू पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख आदींसह शेकडो व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक समाधान नागरे, उपनिरीक्षक बबन पाटोळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तीन वर्षांचा कालावधी एका किलोमीटरच्या काँक्रीटीकरणासाठी लागत असल्याने ठेकेदाराला समोर हजर करण्याची भूमिका उपस्थितांनी मांडली असताच ठेकेदार हजर झाले.

यावेळी त्यांच्या विरोधात घोषणा देत उपस्थितांनी संताप व्यक्त केला. यावर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जि. प. माजी अध्यक्षा जयश्री पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, जि. प. माजी सभापती रवींद्र देवरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, भूषण पगार, विलास शिरोरे, दीपक महाजन, जयंत देवघरे यांनी सर्वांची समजूत काढून वातावरण शांत केले होते. पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, तहसीलदार बंडू कापसे,सार्वजनिक बांधकाम अधिकारी विसावे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वांच्या साक्षीने लेखी आश्वासन ठेकेदाराकडून देण्यात आले.

होते त्यानंतरच व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने खुली केली होती परंतु सदर ठेकेदाराने आजही ह्या रस्त्याचे काम पूर्ण केलेले नसून अनेक ठिकाणी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागते याची जाणीव ठेकेदाराने ठेवून सदर रस्ता पूर्ण करून कळवणची जनता, नागरिक, व्यापारी, वाहनधारक, यांची ही समस्या सोडविणे काळाची गरज बनलेली आहे कळवण वासीयांचे आरोग्य ह्या रस्त्यामुळे धोक्यात आलेले आहे. आता पावसाळा सुरू झालेला असून पावसाळ्यात पावसाचे कारण दाखवून ठेकेदार काम अजून लांबवितो की काय असा प्रश्न कळवण वासीयांना पडलेला आहे.

पावसाळ्यात ह्या रस्त्याची गुणवत्ता किती चांगली राहील याची शास्वती देता येणार नाही सम्बधित ठेकेदाराने कळवणच्या जनतेचा अंत न बघता त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा कळवणची जनता, नागरिक, व्यापारी, वाहनधारक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कळवण च्या ह्या मेन रोडची समस्या दूर होणे हेच हिताचे ठरेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com