कळवण वार्तापत्र: कळवणला साकारणार अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक

कळवण वार्तापत्र: कळवणला साकारणार अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

कळवण (kalwan) शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या (Population) विचारात घेऊन कळवणकरांना अधिकाधिक आकर्षक व मूलभूत सुविधा (Infrastructure) उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायत (nagar panchayat) सातत्याने प्रयत्न करत असून

कळवणकरांच्या आरोग्याची काळजी (Health care) म्हणुन लवकरच उत्तर महाराष्ट्रातील सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक (Sophisticated jogging track) निर्माण होणार असून सद्यस्थितीत जॉगिंग ट्रॅकचे काम (Jogging track work) प्रगतीपथावर आहे. यामुळे कळवण शहराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे.

कळवण शहराच्या (kalwan city) विकासासाठी आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) व नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली विविध कामे मार्गी लागत असून नवनवीन नागरी सुविधांची निर्मिती केली जात आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शनिमंदिर ते संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत जॉगिंग ट्रॅक (Jogging track) उभारणार असून नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत आमदार नितीन पवार यांच्या विशेष पाठपुराव्याने

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Former Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी या प्रकल्पासाठी निधी मंजूर (fund) करावा अशी मागणी केली असता या प्रकल्पासाठी 22 कोटी रुपये मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून शनी मंदिर ते बाजार पटांगण (एकलहरे रास्ता) या पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

यावेळी कळवण-सुरगाणा मतदार संघाचे (Kalwan-Surgana constituency) आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, कळवण शहराच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कळवणकरांनी माझ्यावर विश्वास ठेऊन सत्ता दिली त्यामुळे कळवण शहरात अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून जॉगिंग ट्रॅक सारखे नाविन्यपूर्ण प्रकल्प आगामी काळात करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले.

कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी सांगितले की, आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचा (kalwan city) कायापालट करून जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात विकासकामांच्या बाबतीत कळवण नागरपंच्यात रोल मॉडेल ठरेल यासाठी प्रयत्नशील असून विकासकामांसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार नितीन पवार यांनी निधी दिल्याबद्दल कळवणकरांच्या वतीने आभार मानले.

युवा नेते भूषण पगार यांनी सांगितले की, कळवण शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या विकासाप्रती असलेल्या अपेक्षा यातून कळवण शहरात विविध शहरी सुविधा निर्माण होत असून येत्या काळात आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहराचे रूप अधिक आकर्षक आणि विकासाभिमुख असेल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

प्रमुख वैशिष्ट्ये

  • आकर्षक प्रवेश द्वार

  • अंदाजे 1100 मीटर लांबी

  • ट्रॅक बनवताना ब्रिकबॅट मध्ये बनवणार

  • प्रस्तावीत लांबीत दोन आकर्षक पुलांचा समावेश

  • नदीच्या प्रवाहाने जमिनीची झीज होऊ नये यासाठी पुर्ण लांबीला सिमेंट कॅांक्रिटच्या भिंतींची तटबंदी

  • बाराही महीने नदीच्या प्रवाहात स्थिर पाणी राहील यासाठी बंधारे

  • नदी लगतच्या बाजुस सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणी बाकांची सोय

  • संपुर्ण ट्रॅकच्या लांबीला उत्तम सावलि आणि अधिकाधिक आक्सिजन उत्सर्ग करणारी झाडांची लागवड

  • ट्रॅक वरुन धावताना प्रसन्न वाटण्यासाठी रंगीबेरंगी झुडुपांनी सजावट

  • वातावरणात निर्मीती साठी वॅाटर प्रुफ म्युझिक सिस्टम

  • सतिमाता मंदीर व संगमेश्वर महादेव मंदिर परिसरांत योगासाठी चबुतरा

  • संपुर्ण लांबीत तीन ठिकाणी सुलभ शौचालयांची सोय

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com