कळसुबाई-हरिशचंद्रगड अभयारण्य पर्यटकांसाठी होणार ऑनलाइन

ड्रोनद्वारे घेतला जातोय नविन स्पॉट्चा शोध
कळसुबाई-हरिशचंद्रगड अभयारण्य पर्यटकांसाठी होणार ऑनलाइन

नाशिक | Nashik

नाशिक वनवृत्त्तामधील (Nashik Range Forest) कळसुबाई-हरीशचंद्र गड (Kalsubai Harishchandra Fort Sanctuary)) अभयारण्यात पुढील पंधरा दिवसांमध्ये पर्यटकांना ऑनलाइनची व्यवस्था (Online Services) होणार आहे.

वन्यजिव विभागाकडून (Forest Department) यासाठीचे प्रयत्न सुरु असून पर्यटकांना घरबसल्या या अभयारण्यात जाण्यासाठी ऑनलाइनद्वारे नोंदणी (Online Registration) करता येणार आहे. वन्यजिव विभागाची ऑनलाइन पेजचे काम करणार्‍या संस्थेशी चर्चा सुरु आहे.

कळसुबाई-हरिशचंद्र गड अभयारण्यास पर्यटकांचा चांगलाच प्रतिसाद (Tourist Good Response मिळतोय. गर्दी होत असल्याने नूकताच येथे विकेंड लॉकडाउन (Weekend Lockdown) घेण्यात आला आहे. भविष्यात पर्यटकांची गर्दी (Heavy Crowd Of Tourist) वाढविण्यासाठी वन्यजिव विभागाकडून प्रयत्न सुरु असून ड्रोनद्वारे नविन स्पॉट (Spot Visit By Drone) टिपले जात आहे.

कोरोनामुळे दीड वर्षापासून नाशिक वनवृत्त्तामधील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य (नाशिक)(Nandurmadhymeshwer Bird Sanctuary), कळसुबाई-हरिशचंद्रगड अभयारण्य (नगर), अनेर डॅम (Aner Dam) (धुळे), यावल (जळ्गांव) या अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात प्रवेश बंदीस मनाई करण्यात आली होती.

जूनच्या पहिल्याच आठ्वड्यात अभयारण्यावरील बंदी (No Entry For Tourist) उठविण्यात आली. यानंतर पर्यटकांकडून कळसुबाई-हरिशचंद्रगड अभयारण्यास पसंती मिळत आहे. पर्यटकांनी करोना नियमांचे उल्लंघन करु नये, याकरिता वन्यजिव विभागाचे लक्ष आहे.

पावसाळा सुरु झाल्याने या अभयारण्यातील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून( North Maharashtra) विविध भागातील पर्यटकांची गर्दी होते आहे. अभयारण्यात अटी शर्थीचे पालन करणार्‍या पर्यट्कांना प्रवेश दिला जातोय.

थर्मल स्क्रिनिंगपासून (Thermal Scanning) ते सोशल डिस्ट्ंन्सीगचे (Social Distnsing)नियम मोडले जाणार नाही, याकडे कळसुबाई-हरिशचद्रगड अभयारण्यातील अधिकारी लक्ष ठेवून आहे. लवकरच पर्यटकांच्या सोयीसाठी वन्यजिव विभागाकडून ऑनलाइनचा पर्याय दिला जाणार आहे. नाशिक वनवृत्तामधील अभयारण्यात ऑनलाइनचा प्रयोग केला नसल्याने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या माध्यमातून ऑनलाइनचा प्रयोग केला जात आहे.

तीस हजार हेक्टर अभयारण्याचे क्षेत्र

कळसुबाई-हरिशचंद्रगड अभयारण्य क्षेत्राचा विचार केला तर तब्बल 30 हजार हेक्टरवर हा निसर्गरम्य भाग बसला आहे. 18 हजार हे्नटर वन्यजिव विभाग तर 12 हजार हे्नटर महसूल विभागाच्या ताब्यात हे क्षेत्र आहे.

पंधरा दिवसात ऑनलाइन नोंद्णीची शक्यता

पुढील पंधरा दिवसामध्ये कळसुबाई-हरिशचद्रगड अभयारण्यात पर्यटकांसाठी ऑनलाइनची व्यवस्था सुरु करण्याचा प्रयत्न आहे. विनाकारण धिंगाणा करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नविन पाच चेकपोस्ट तयार करण्यात आले. पर्यटन वाढीसाठी ड्रोनद्वारे आणखी चांगले स्पॉट शुट केले जात आहे.

- गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, कळ्सुबाइ-हरिश्चंद्रगड अभयारण्य

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com