'क्रांतीसुर्य'ने उघडणार कालिदासचा पडदा

उद्या पाच वाजता प्रयोग
'क्रांतीसुर्य'ने उघडणार कालिदासचा पडदा

नाशिक । Nashik

करोना विषाणुच्या साथीमुळे लागु झालेल्या लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या टप्प्यात आता नाशिक महापालिकेच्या महाकवि कालिदास कलामंदिराचा पडदा उद्या (दि.3) क्रांतीसुर्य या नाटकाच्या सादरीकरणाद्वारे उघडणार आहे. यानिमित्ताने आता कालिदास कलामंदिरात नाटकांसह कार्यक्र्माचे सादरीकरण होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि.3 जानेवारी हा दिवस राज्य शासनाने महिला शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

यानिमित्त महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाजसुधारणा व मागासवर्गीय समाजातील मुलींना शिक्षण देतांना कोणत्या अडचणीवर कशी मात केली.

या विषयावर क्रांतीसुर्य हे नाटक हिदी भाषेत सादर करण्यात येणार आहे. तीन जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता विनामुल्य प्रवेश आहे. या नाटकाचा लाभ घेण्याचे आवाहन माळी समाज सेवा समिती अध्यक्ष विजय राऊत व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com