पुरातन सुंदर नारायण मंदिराची कलश स्थापना

पुरातन सुंदर नारायण मंदिराची कलश स्थापना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik


सुंदर नारायण मंदिराच्या (Sundar Narayan Temple) जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने पूर्णत्वास आले असून आज दि. २८ रोजी, या मंदिराची कलश स्थापना झाली.

मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक पुरातन मंदिरे (Historical ancient temples) आहेत. पर्यावरणातील बदलामुळे काही मंदिरांची झीज होत आहे. या मंदिरांच्या यादीत पुरातन काळातील  श्री. सुंदर नारायण मंदिराचाही समावेश आहे.

संपूर्ण काळ्या पाषाणात दगड, चुना, शिसव, नवसागरचा वापर करून हे मंदिर 1756 साली बांधण्यात आले होते. सद्यस्थितीत हे मंदिर विविध कारणाने धोकादायक स्थितीत पोहचल्याने पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु केले होते. त्यासाठी केंद्र सरकारकडून 12 कोटीहून अधिक निधी मंजूर करण्यात आला.

हा निधी पुरातत्व विभागाकडे (Department of Archaeology) सुपूर्द करण्यात आल्यानंतर कामास सुरूवात झाली होती. दरम्यान जवळील एका इमारतीत सुंदर नारायण मंदिरातील मूर्तीचे स्थलांतरण करण्यात आले होते. आज या मंदिराच्या कलशाची स्थापना करण्यात आली असून, याप्रसंगी जतन सहाय्यक विजयकुमार धुमाळ,  अजिंक्यतारा कन्सल्टंट चे आर्किटेक स्मिता कासार-पाटील, अभियंता योगेश कासार पाटील, गायत्री कन्स्ट्रक्शन चे व्यंकटेश्वर राव, बालासुब्रमण्यम तसेच सचिन पगारे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com