ज्योती चव्हाण यांना कला रत्न पुरस्कार

ज्योती चव्हाण यांना कला रत्न पुरस्कार

देवळाली कॅम्प । वर्ताहर Deolali

मनुष्यबळ विकास अकादमी मुंबई (Mumbai) आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनात (State Level Gunijan Gaurav Mahasammelan) नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) बेलतगव्हाण येथील युवा चित्रकार व डॉ गुजर सुभाष हायस्कूल च्या कला शिक्षिका ज्योती चव्हाण (Art teacher Jyoti Chavan) यांना राज्यस्तरीय आदर्श युवती (State level ideal young lady) युथ आयकॉन कलारत्न पुरस्काराने (Youth Icon Kalaratna Award) सन्मानित करण्यात आले.

करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मुंबई येथे ऑनलाईन (Online) पद्धतीने संपन्न झालेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या दहा पासून कलाक्षेत्रात काम करत असलेल्या चव्हाण यांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकाविले आहे तसेच त्यांच्या अनेक चित्रकृती या परदेशात गेल्या आहेत.

अमूर्त चित्रशैलीत (abstract painting) आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या या युवा चित्रकर्ती चे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.समाजातील दुर्बल घटकांना देखील आपली कला जोपासता यावी यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी आदिवासी पाड्यावर अनेक मोफत कार्यशाळा (Workshop) घेतल्या आहेत.

यांच्या याच कार्याचा सन्मान मनुष्यबळ विकास अकादमी चे अध्यक्ष कृष्णाची जगदाळे यांनी केला आहे. मानाचा फेटा मानकरी बॅच, महावस्त्र ,गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रेरणा देतात व त्यातून नवनिर्मिती होते हा मानस यावेळी जगदाळे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.