कलानगर चौकातील घरफोडी 'सीसीटीव्ही'त कैद

कलानगर चौकातील घरफोडी 'सीसीटीव्ही'त कैद

नाशिक । Nashik :

भर दुपारी कडीकोयंडा तोडून चोरटयांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना इंदिरानगर (Indiranagar) भागातील कलानगर (kalanagar) येथील बालाजी पार्कमध्ये (Balaji Park) घडली होती. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून पोलीस तपासाला गती दिली जात आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. १९ रोजी वैयक्तिक कामानिमित्त घर मालक भारती रवींद्र नावरे (Bharti Ravindra Navare) ( रा.बालाजी पार्क फ्लॅट नंबर ३ कलानगर) या दुपारी ११ वाजेच्या सुमारास घराबाहेर गेल्या होत्या. यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या घरी आल्या; त्यावेळी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर त्यांनी घराच्या आत मध्ये प्रवेश केला असता घरातील संपूर्ण साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होते. तसेच अज्ञात चोरट्यांनी (unknown thieves) त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने (Gold silver jewellery) चोरून नेले होते. यानंतर नावरे यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथकाद्वारे त्यांचा मागावा घेतला.

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात (Indiranagar police station) रवींद्र भगवानदास नावरे (Ravindra Bhagwandas Navare) यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) संजय बांबळे (Sanjay Bamble) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस (police) पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com