रोलेट खटल्यातून कैलाश शहांची निर्दोष मुक्तता

रोलेट खटल्यातून कैलाश शहांची निर्दोष मुक्तता

संबंधिता विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल

नाशिक प्रतिनिधी : Nashik

राज्यभर गाजलेल्या रोलेट जुगारामुळे (Roulette gambling) दोन जणांनी आत्महत्या (suicide) केल्याच्या खटल्यात कैलास शहा यांच्या विरोधात त्रंबक पोलीस ठाण्यात (Trambak Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात कैलास शहा यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी कैलास शहा यांनी संबंधिता विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,संदिप दिलीप मेढे यांनी २०१७ मध्ये तर नामदेव रामभाऊ चव्हाण यांनी २०१९ मध्ये आत्महत्या (suicide) केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यात कैलास जोगिंदरप्रसाद शहासह अन्य आरोपी करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर पोलीसांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून न्यायालयात जुगार प्रतिबंधक कायदा (Gambling Prevention Act) व आत्महत्येस प्रवृत्त करणे (Inducing suicide) या संदर्भात दोषारोप पत्र पाठविले.

जिल्हा सत्र न्यायालय, नाशिक (District Sessions Court, Nashik) येथे दोन्ही खटल्यामध्ये निकाल लागला असून दोन्ही खटल्यामधुन संशयीत आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. यामधील एका खटल्यात सरकार पक्षाचे आरोप हे खटला चालविण्याजोगे नसल्याने त्यातून संशयितांना दोषमुक्त करण्यात आले असून दुसऱ्या खटल्यात निर्दोष मुक्त (Accused acquitted) केले.

सदर दोन्ही खटल्यामध्ये मयत जुगार खेळत होते असा कुठलाही पुरावा मिळाला नाही. परंतु सदर खटल्यामुळे व माध्यमांमध्ये झालेल्या बदनामीमुळे शहा यांच्या कुटुंबियांची बदनामी झाल्याने त्यांनी फिर्यादी व त्यांना चुकीची माहिती पुरावणारे व्यक्ती मीना नामदेव चव्हाण, दिलीप नामदेव मेढे व गोरख त्रंबक गवळी यांचे विरूद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याकामी नोटीसा दिल्या आहेत. शहा यांच्याकडून ॲड. राहुल कासलीवाल यांनी सदरहू खटला चालवला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com