दिंडोरी नगरपंचायत
दिंडोरी नगरपंचायत
नाशिक

दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कैलास मवाळ

रचना जाधव रजेवर

Gokul Pawar

Gokul Pawar

दिंडोरी । Dindori

दिंडोरी नगरपंचायतीच्या प्र. नगराध्यक्षपदी कैलास मवाळ यांची निवड करण्यात आली.

नगराध्यक्षा रचना जाधव ह्या काही दिवसासाठी वैयक्तिक कामानिमित्त रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायत अधिनियम 1965च्या कलम 57 अन्वये नगराध्यक्षपदाचा कारभार कैलास मवाळ यांच्याकडे हस्तातरीत करण्यात आला.

यावेळी कैलास मवाळ यांनी मनोगत व्यक्त केले. दिंडोरी शहराची यापूर्वीही सेवा करीत आलो आहे व पुढेही करीत राहील. नगराध्यक्षपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन नगराध्यक्ष कैलास मवाळ यांनी दिले. कैलास मवाळ यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com