कादवा गळीत हंगामाचा शुभारंभ

शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी; झिरवाळांचे शेतकऱ्यांना आवाहन
कादवा गळीत हंगामाचा शुभारंभ

दिंडोरी / ओझे । प्रतिनिधी | Dindori/Oze

साखर उद्योग (sugar industry) अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete, Chairman of Kadwa Cooperative Sugar Factory) त्यांचे संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरीने काम करत कादवा सुरू ठेवत उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आदर्श निर्माण केला आहे.

गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्तींमुळे (natural disaster) द्राक्ष, भाजीपालाचे नुकसान (crop damage) होत असल्याने शेतकरी (farmers) अडचणीत असताना ऊस (sugar cane) हे शाश्वत पीक बनले आहे. मतदारसंघात पाण्याचे विविध साठे निर्माण केले असून विजेची उपलब्धता वाढविण्याचे सुरू आहे तरी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड (Sugarcane cultivation) करावी असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narahari Zirwal) यांनी केले आहे.

कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadwa Cooperative Sugar Factory) 46 वे गळीत हंगाम शुभारंभ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल, मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अ‍ॅड. रवींद्र पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, मविप्र संचालक सयाजी गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,

चेअरमन श्रीराम शेटे, व्हा.चेअरमन शिवाजीराव बस्ते व संचालक मंडळ आदींच्या हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगाम शुभारंभ झाला. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. प्रारंभी गव्हाण पूजा व श्री. विलास कड, सौ. व श्री.राजाराम भालेराव, सौ. व श्री. भरत देशमुख, सौ. व श्री. रामदास मातेरे, सौ. व श्री. परिक्षीत देशमुख, सौ. व श्री. नारायण पालखेडे यांच्या हस्ते झाले.

पुढे बोलताना नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal) यांनी तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा (Review of development works) घेत बहुतांशी रस्त्यांची कामे मंजूर असून सर्व कामे सुरू जी कामे पावसाळ्यात खराब झाले ते पुन्हा करून घेतले जातील. सर्व कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या असून सर्वांनी चांगले काम करून घेण्यासाठी दक्ष राहावे असे आवाहन केले. यावेळी चेअरमन श्रीराम शेटे यांनी प्रास्ताविक करताना साखर उद्योग व कारखान्याची वाटचाल विषद केले. अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवाने प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात (maharashtra) उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे.

यंदा ऊस तोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुमारे पाच लाख मेटन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरी हंगाम यशस्वितेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. ऊस तोडीचे योग्य नियोजन करत प्राधान्याने कार्यक्षेत्रातील ऊस तोड करण्यात असे सांगितले. केंद्र सरकारने (central goverment) इथेनॉल (Ethanol) ला प्रोत्साहन दिले असून कादवाचा इथेनॉल प्रकल्प (Ethanol Project) या हंगामात कार्यान्वित होत असून त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्या त्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्या असे आवाहन केले.

सीएनजी प्रकल्प (CNG project) विचाराधीन असून संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस शाश्वत पीक असून सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले. यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार शिरीष कोतवाल, मविप्र सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय यांची भाषणे झाली.

यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, तुकाराम पेखळे, दिलीप थेटे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, विश्वासराव देशमुख, राजाराम बस्ते, दत्तात्रेय राऊत, अशोक वाघ, सुनील पाटील, रंजन पवार, राजू ढगे, उत्तम ठोंबरे, रंगनाथ बर्डे, अशोक कबाडे, विठ्ठलराव संधान, बाकेराव जाधव, शिवाजी जाधव, त्र्यंबकराव संधान, दत्तात्रेय जाधव, शंकरराव विठ्ठलराव संधान, भाऊसाहेब बोरस्ते, कैलास मवाळ, गुलाब जाधव, बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, सुरेश बोरस्ते, रामनाथ पाटील, भास्कर भगरे, डॉ.योगेश गोसावी, शाम हिरे, बाजीराव बर्डे, चिंतामण पाटील, बाळासाहेब भालेराव,

अशोक भालेराव, रामभाऊ ढगे, सुरेश कळमकर, संजय जाधव, दत्तात्रेय गटकळ, बाबुराव डोखळे, सुरेश कोंड, प्रकाश देशमुख, पंढरीनाथ संधान, बापूराव पाटील, तानाजी बबनराव देशमुख, छबू मटाले, भाऊसाहेब पाटील, बाळासाहेब सरोदे, गणपतराव सरोदे, पांडुरंग गडकरी, तुकाराम जोंधळे, शिवाजी दळवी, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, संचालक दादासाहेब पाटील, बाळकृष्ण जाधव, शहाजी सोमवंशी, दिनकरराव जाधव, विश्वनाथ देशमुख, बापूराव पडोळ, अमोल भालेराव, सुखदेव जाधव, सुभाषराव शिंदे, मधुकर गटकळ,

सुनील केदार, राजेंद्र गांगुर्डे, रामदास पिंगळ, नामदेव घडवजे, उगले, अशोक वडजे, सोमनाथ मुळाने, साहेबराव कक्राळे, गंगाधर निखाडे, संतोष मातेरे आदींसह सर्व संचालक, अधिकारी सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत कार्यकारी संचालक हेमंत माने, संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com