कादवा कारखान्याचा बॉयलर पेटणार

कादवा कारखान्याचा बॉयलर पेटणार
साखर कारखाना

ओझे | वार्ताहर | Oze

कादवा सहकारी साखर कारखान्याची (Kadwa Sugar Factory) गळीत हंगामाची सर्वतोपरी तयारी झाली आहे. रविवार दि १० ऑक्टोबरला बॉयलर अग्नीप्रदिपन सोहळा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे...

बॉयलर पूजा बाळासाहेब देशमुख व मधुकर टोपे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी चेअरमन श्रीराम शेटे राहणार आहे. कादवाने यंदा गळीत हंगामाची पूर्ण तयारी करत अधिक क्षमतेने गाळप करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी विविध मशिनरीची दुरुस्ती देखभालीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

ऊसतोडणीसाठी पुरेशी मजूर भरती करण्यात आली आहे. तरी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळ्यास करोनाबाबतचे सर्व निर्देश पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन कादवाच्या संचालक मंडळाने केले आहे.

Related Stories

No stories found.