
दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori
गेल्या दिवसांपासून पत्रकारितेच्या (journalism) क्षेत्रामध्ये काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते (Social workers) तथा पत्रकार बापू चव्हाण यांना नुकताच कादवा प्रतिष्ठानचा कादवा गौरव पुरस्कार (Kadva Gaurav Award of Kadva Foundation) देऊन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले.
नाशिक (nashik) येथे झालेल्या कादवा प्रतिष्ठान सोहळा (Kadva Foundation Ceremony) पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी हिरामण, प्रा. डॉ. यशवंत पाटील, डॉ. विलास देशमुख, विठ्ठलराव संधान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. धोंडगे यांनी अध्यक्ष स्थानावरून सांगितले की, साहित्यिकांची साहित्यनिर्मिती ही समाजाच्या भावनांचे प्रतिबिंब असते ग्रामीण भागातून (rural area) प्रतिकूलता छेदत साहित्य माणसात जगण्याचे बळ निर्माण करते अशा जिवनोन्मुख साहित्यिकांचे बळ त्यांचे गौरव सोहळे वाढवतात असे सांगितले.
यावेळी क्षेत्रात आपल्या यावेळी विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटणार्या नामवंतांचा गावाकडची आयडॉल म्हणून कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कादवा गौरव पुरस्काराचे मानकरी म्हणून प्रा. डॉ. हिरामण शिरसागर (शैक्षणिक), डॉ. महेंद्र वाघेरे (वैद्यकीय), बापू चव्हाण (पत्रकारिता), सुरेखा बोराडे (साहित्य), विजय ढुमणे (शेतीपूरक व्यवसाय), पोपटी कांबळे (सांस्कृतिक), माणिकराव गोडसे (साहित्य राहुल कावळे (कृषी), अनिल चौगुले (उद्योजकता), अनंत जेट्ट (प्रशासकीय), बापूसाहेब गायकवाड (सहकार), प्रकाश कोल्हे (सामाजिक) आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कादवा प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठल संधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार मिठे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.मानपत्राचे वाचन केले. तर आभार प्रा.राजेश्वर शेळके यांनी केले.याप्रसंगी कवी, विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.