कादवा कारखाना निवडणूक: छाननीत मात्तबरांचे अर्ज बाद; विरोधक अपिल करणार

कादवा कारखाना निवडणूक: छाननीत मात्तबरांचे अर्ज बाद; विरोधक अपिल करणार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dinodri

कादवा कारखान्याची (kadva factory) यंदाची निवडणूक (election) प्रतिष्ठेची बनल्याने दिवसेंदिवस आरोप - प्रत्यारोपाने कादवा कारखान्याच्या निवडणूकीत रंगत भरली जात आहे.

काल अर्ज छाननीच्या दिवशी तीन वर्ष ऊस कारखान्याला (Sugarcane mills) पाठवण्याच्या मुद्यावरुन बहुतेक मात्तबरांचे अर्ज बाद (application cancel) झाल्याने एकच कल्लोळ उडून सत्ताधार्‍याच्या दबावाखाली प्रशासनाने अर्ज बाद केल्याचे आरोप विरोधकांनी केले असून त्या विरोधात अपीलात जाण्याची भुमिका विरोधकांनी घेतल्याने पुढे काय होणार ? याकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष वेधले आहे.

कादवा कारखान्याच्या (kadva factory) निवडणूकीसाठी (election) एकुण 96 उमेद्वारांनी 146 अर्ज दाखल केले होते. सोमवारी अर्ज छाननीचा दिवस असल्याने सर्व उमेद्वारांनी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी जी. जी. पुरी यांनी गटाप्रमाणे उमेद्वारांना बोलावून अर्जाची छाननी केली. त्यात छाननीत मात्तबरांचे अर्ज बाद झाले. यावेळी पाच वर्षात तीन वेळा कादवाला ऊस देण्याची नोंदीच्या मुद्दा तसेच थकबाकी कर्जदार या मुद्यावरुन बहुतेक अर्ज बाद करण्यात आले.

त्यात सत्ताधार्‍यांकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Jirwal) यांचे सुपुत्र गोकूळ झिरवाळ, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शाम हिरे तर विरोधकांकडून माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, अ‍ॅड. बाजीराव कावळे यांचे नातू हर्षवर्धन कावळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीप जाधव, विजय कोतवाल, बबन पुरकर, अ‍ॅड. विलास निरघुडे, संपतराव वक्ते आदी मात्तबरांचे अर्ज बाद झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकुण 146 उमेदवारांपैकी किती उमेद्वारांचे अर्ज बाद झाले याविषयी रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून यादी प्राप्त झाली नाही. एका उमेद्वारी अर्जावर आक्षेप नोंदविला गेल्याने आज सकाळी 11 वाजेपर्यत यादी प्रसिध्द करण्यात येईल, असे माध्यमप्रतिनिधींना सांगितले. अर्ज बाद झालेल्या उमेद्वारांना अपील करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी अपीलाची भुमिका घेतल्याने सुनावणी दरम्यान काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कादवा कारखान्याच्या निवडणूकीत दाखल केलेल्या अर्जांची छाननीचा दिवस असल्याने आज सर्व उमेद्वारांना बोलावून उमेद्वारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात शासकीय नियमानुसार ज्या कागदपत्राच्या अपुर्ततेनुसार अर्जदारांचे अर्ज बाद झाले असून कोणत्याही नियमबाह्य जावून कोणत्याही दबावला बळी न पडता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निर्णय घेतला आहे. ज्या उमेद्वारांना आक्षेप असेल त्यांना अपीलासाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे.

- जी. जी. पुरी, निवडणूक निर्णय अधिकारी

आपल्या देशात लोकशाही आहे. कायदा, नियम व उपविधीनुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आज कादवा निवडणूकीसाठी इच्छुक उमेद्वारांनी भरलेल्या अर्जाची छाननी केली आहे. किरकोळ अपवाद वगळता कोणीही आक्षेप घेतलेले नाही. लोकशाहीनुसार अन्यायांविरुध्द दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. विरोधकांनी पाहिजे असल्यास त्याचा वापर करावा. आम्ही लोकशाहीला मानणारे असून आम्ही कायद्याचा आदर करतो. तसेच विरोधकांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे येथे कायदा बाह्य काहीही घडलेले नाही, असा खुलासा करतो.

- श्रीराम शेटे, चेअरमन कादवा कारखाना

सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली येऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी विरोधकांचे अधिकाधिक अर्ज कसे बाद होतील, याकडे जास्त लक्ष देवून विरोधकांना झुकते माप देण्याचे काम केले आहे. या मागच्या कोणत्याही संचालक मंडळाने अर्जावर कोणताही संचालक मंंडळाने आक्षेप घेतला नव्हता. या संचालक मंडळाने सत्तेचा गैरवापर करुन विरोधकाचे अर्ज बाद केले. जर आम्ही चुकीचे होतो तर सत्ताधार्‍यांनी लोक न्यायालयात गेले पाहिजे होते. परंतू तसे न करता चुकीचा पायंडा घातला असून या वृत्तीचा मी अर्ज बाद झालेल्या सर्व उमेद्वारांच्या वतीने निषेध व्यक्त करतो.

- प्रवीण जाधव, माजी जिल्हा परिषद गटनेते

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com