कादवा कारखाना निवडणूक: पहिल्याच दिवशी 77 अर्ज विक्री; पाच दाखल

कादवा कारखाना निवडणूक: पहिल्याच दिवशी 77 अर्ज विक्री; पाच दाखल

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या (Kadva co-operative sugar factories) पंचवार्षिक निवडणुकीस (election) कालपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी विक्रमी 77 उमेद्वारी अर्जांची विक्री (Sale of applications) झाली आहे.

विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांच्यासह पाच उमेद्वारांनी अर्ज दाखल केले असून पहिल्याच दिवशी इच्छुकांनी गर्दी केल्याने निवडणूकीत प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे.

काल पासून कादवा कारखान्याच्या (kadva factory) निवडणुकीच्या उमेद्वारी अर्ज (Candidature application) दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जाची विक्री झाली असून दि. 4 मार्च रोजी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. पहिल्याच दिवशी 77 अर्ज विक्री झाल्याने दि. 4 रोजी पर्यंत किती अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकुणच कारखान्याची उमेद्वारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नेतृत्वासमोर इच्छुकांची संख्या प्रमाणात ठेवण्याचे आवाहन राहिल, असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. ही निवडणूक पक्ष विरहीत लढवली जाते. यात नात्यागोत्यांचा गोतावळा असणार्‍या उमेदवारांची वर्णी लागत असते. त्यामुळे नेतृत्वाला अशा उमेद्वारांचा शोध असेल.

काल दिवसभरात खेडगाव (khedgaon) गटातून विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी गटातून विद्यमान संचालक बाळकृष्ण जाधव, दिनकर जाधव, महिला राखीव गटातून विद्यमान संचालिका शांताबाई पिंगळ तसेच उज्वला पिंगळ यांनी अर्ज दाखल केला. दि.25 फेबु्रवारी ते 4 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.

दि. 7 मार्च रोजी सकाळी 11 वाजता छाननी होणार आहे. 8 मार्च ते 22 मार्च रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत आहे. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अंतिम विधी ग्राह्य नामनिर्देशन यादी व निशाणी वाटप होणार आहे तर आवश्यक असल्यास दि. 3 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार असून दि.4 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यालय दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय निळवंडी रोड दिंडोरी येथे असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. जी. पुरी काम बघत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com