‘कादवा' च्या गळीत हंगामास आजपासून शुभारंभ

‘कादवा' च्या गळीत हंगामास आजपासून शुभारंभ

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

कादवा सहकारी साखर कारखान्याचा 44 वा गळीत हंगाम शुभारंभ गुरूवार दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोव्हिड 19 चे सर्व निर्देश पाळून संपन्न होणार असल्याची माहिती अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष बाजीराव कावळे, खासदार डॉ. भारती पवार, आ. राहुल आहेर, आ. दिलीप बनकर, आ. नितीन पवार, आ. हिरामण खोसकर, आ. सरोज आहिरे, आ. माणिकराव कोकाटे, माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, माजी आमदार शिरीशकुमार कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

यावेळी मच्छिंद्र पवार(पाडे), खंडेराव दळवी (लखामपूर ), विनायक देशमुख (खेडले), मधुकर बोरस्ते (हातनोरे), मिनानाथ जाधव (बोराळे) यांच्या हस्ते गव्हाणपूजन होणार आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. पुरेशी ऊस तोड मजूर भरती करण्यात आली असून ऊस तोड कार्यक्रम आखण्यात आला आहे. कार्यक्रमास सर्व सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांनी कोव्हिड 19 चे सर्व निर्देश पाळून उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, प्र. कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com