कादवा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

देशदूतचे नितीन गांगुर्डे यांना ‘ जलदूत ’ पुरस्कार
कादवा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

पालखेड बंधारा Palkhed Canal येथील कादवा प्रतिष्ठानच्या Kadava Pratishthan वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 2021 या वर्षाचे कादवा गौरव पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे, दिनकरराव गायकवाड, विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केले आहे.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विराजमान झालेले नरहरी झिरवाळ यांना राजकीय क्षेत्रातील तर कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा पुरस्कार मोहाडी येथील सुरेश कळमकर यांना जाहीर झाला आहे.

दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पाणी प्रश्नांवर व पर्यटन विकासावर काम केल्याने दैनिक देशदूत विभागीय कार्यालयप्रमुख नितीन गांगुर्डे यांना जलदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून नितीन गांगुर्डे यांनी पत्रकारीतेतून व प्रत्यक्ष आदिवासी भागात काम करुन पाणी प्रश्नांबाबत जागृती केली आहे. जलपरिषद, मित्र परिवार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम करुन पाण्याबाबत लिखान केले आहे.

या वर्षाचे विविध क्षेत्रातील कादवा गौरव पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे हंसराज देशमुख (उद्योजक), नितीन गांगुर्डे (जलदूत), दीपक बागमार (वैद्यकीय ), जी आर. आढाव (प्रशासकीय), विलास जमधडे (शैक्षणिक ), ज्ञानेश्वर गणोरे (कृषी पुरक उद्योग), भगवान गायकवाड (पत्रकार), किरण सोनार (सामाजिक), नितीन झगरे (सांस्कृतिक) या मान्यवरांना कादवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील परशुराम साईखेडकर नाट्यगृहात रविवार दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केल्याची प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी दिली.

Related Stories

No stories found.