के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घुमला आवाज अभिरूप संसदेचा

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घुमला आवाज अभिरूप संसदेचा

नाशिक | Nashik

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी विकास मंडळ आणि के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ०२ मार्च २०२३ रोजी ‘क्रांतिवीर वसंतराव नाईक अभिरूप संसद स्पर्धेचे’ (Krantiveer Vasantrao Naik Abhirup Sansad competition)आयोजन करण्यात आले होते.  

भारतातील संसदीय (Parliamentary) राजकारणाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, संसदीय कार्यप्रणाली विषयी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकभाव निर्माण व्हावा अशा हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे स्पर्धेचे समन्वयक तथा, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय काळे यांनी सांगितले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घुमला आवाज अभिरूप संसदेचा
कसबा पोटनिवडणुकीत चर्चेत असलेल्या बिचुकले आणि दवे यांना किती मतं पडली?

आयोजित स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सानप (Principal Dr. Sanjay Sanap) हे होते, त्यांनी आपल्या उद्घाटनपर केलेल्या मनोगतात संसदीय राजकारणाचे महत्व आणि त्यातील तरुणांचा सहभाग याविषयीची आवश्यक अनेक दाखले देत स्पष्ट केली; तसेच सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

पिंपळगाव बसवंत महाविद्यालय, महिला महाविद्यालय नाशिक रोड, दिंडोरी महाविद्यालय, सिन्नर महाविद्यालय, के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय नाशिक(राज्यशास्त्र विभाग) (K. V. N. Naik College Nashik) अशा एकूण पाच महाविद्यालायांच्या संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून अतिशय अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घुमला आवाज अभिरूप संसदेचा
परिचारिकेला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

या स्पर्धेत प्रत्येक संघाला १५ ते २० मिनिटांच्या मर्यादित अवधित संसदीय कामकाजाचे प्रत्यक्ष सादरीकरण सांघिकरित्या करावे लागते. संसदेमधील प्रश्नोत्तराचा तास, विरोधकांची आक्रमकता, सभागृहाचे स्थगन, सत्ताधाऱ्यांची विरोधकांकडून होणारी कोंडी, सभात्याग, विधेकावर विषयवार चर्चा या सर्व बाबी दिलेल्या मर्यादित कालावधीत सादर कराव्या लागतात, या कसोटीवर सहभागी संघांनी उत्तम सादरीकरण केले असल्याचे मत स्पर्धेचे परिक्षक प्रा. राजेंद्र सानप यांनी नोंदविले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात घुमला आवाज अभिरूप संसदेचा
नाशिकमध्ये होणारा 'तो' प्रकल्प पुण्यात; भुजबळांच्या तारांकित प्रश्नावर सामंतांचे उत्तर

सर्व सहभागी संघांचे सादरीकरण झाल्यानंतर परीक्षकांनी केलेल्या अचूक परीक्षणावरून संघांच्या विजयाची क्रमवारी घोषित करण्यात आली, यानुसार दिंडोरी येथील के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला असून, द्वितीय क्रमांक मराठा विद्याप्रसारक समाज संस्था (Maratha Vidyaprasarak Samaj Sanstha) संचलित, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (पिंपळगाव ब.) यांनी मिळविला, तर तिसऱ्या स्थानावर  महिला महाविद्यालय, नाशिक रोड या संघाने आपले नाव निश्चित केले.

त्याबरोबरच के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय, नाशिक, या संघातील स्नेहल हिरामण पवार, ऋतुजा काळे या विद्यार्थीनींनी आपल्या अभ्यासपूर्ण, संयत आणि करारी सादरीकरणाने ‘आदर्श संसद पटू’ या पारितोषिकावर आपले नाव कोरले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

याप्रसंगी स्पर्धक संघांसोबत प्रा. सरोजिनी आहिरे, प्रा. गाडे, प्रा. अरुण पोटे आदी मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते, स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी राज्यशास्त्र विभागाचे (Department of Political Science) विभागप्रमुख डॉ. संजय काळे आणि विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. शरद काकड यांनी सांभाळली, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजेंद्र झोळेकर, प्रा. डॉ. धीरज झाल्टे यांच्यासह इतर प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले. प्रा. शीतल लहाने यांनी सुत्रसंचलन केले, तर डॉ. काकड यांनी आभार व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com