के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात Geospatial Technology या विषयावर कार्यशाळा संपन्न

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात Geospatial Technology या विषयावर कार्यशाळा संपन्न

दिंडोरी | Dindori

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी आणि वेस्टर्न रिजनल सेंटर, आयसीएसएसआर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल विभागाच्या वतीने ॲप्लिकेशन ऑफ जिओ टेक्नोलॉजी (Geospatial Technology) इन जिओग्रफिकल रिसर्च याविषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक (Krantiveer Vasantrao Narayanarao Naik) शिक्षण प्रसारक संस्थेचे सरचिटणीस आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंतअप्पा धात्रक, प्रमुख अतिथी म्हणून एसएनडीटी विद्यापीठ पुणे कॅम्पस येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र नगराळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुधाकर परदेशी, केव्हीएन नाईक महाविद्यालय नाशिक येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र झोळेकर, एसएनजेबी महाविद्यालय चांदवड येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. चांगदेव कुदनर, मविप्र संचालित सटाना महाविद्यालयातील भूगोल विभागाचे डॉ. भारत गडाख, प्रा.डॉ.बाळासाहेब चकोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, उपप्राचार्य डॉ. सुनील उगले, भूगोल विभाग प्रमुख राजेंद्र डोईफोडे, कार्यशाळा समन्वयक डॉ. संतोष भैलुमे हे उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करत प्रमूख पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. राजेंद्र डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले; तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोष भैलूमे यांनी करून दिला. अध्यक्षीय भाषण संस्थेचे सरचिटणीस हेमंतअप्पा धात्रक यांनी केले. आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील उगले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप गांगुर्डे यांनी केले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात Geospatial Technology या विषयावर कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र दिन साजरा करण्याविषयी शासनाची नियमावली जाहीर; 'हे' आहेत निर्देश

डॉ. विरेंद्र नगराळे यांनी आपल्या बीजभाषणातून भौगोलिक माहितीचे संकलन, विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन हे भौगोलिक तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट आहे असे सांगितले. पायाभूत सुविधांच्या नियोजनापासून आपत्ती व्यवस्थापन ते पर्यावरण संरक्षणापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये भूगोलाचे आणि जिओस्प्याशियल टेक्नोलॉजीचे योगदान आहे असे नमूद केले.

भू-स्थानिक तंत्रज्ञानातील सर्वात लक्षणीय प्रगती म्हणजे रिअल-टाइम डेटा संकलित करण्याची आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता. उपग्रह,जीपीएस आणि मोबाईल उपकरणे यांसारख्या विविध तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे ही क्षमता शक्य झाली आहे. अलिकडच्या काळात तंत्रज्ञानामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे ज्यामुळे ते आणखी प्रभावी आणि उपयुक्त बनले आहे असे प्रतिपादित केले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात Geospatial Technology या विषयावर कार्यशाळा संपन्न
भीषण अपघात; मनमाड-मालेगाव महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पलटी

दुसऱ्या सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University), पुणे येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुधाकर परदेशी यांनी ॲप्लिकेशन ऑफ जिओस्प्याशियल टेक्नोलॉजी इन सोशल सायन्स रिसर्च यावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुगल अर्थ आणि ओडीके यांचा वापर भौगोलिक माहिती गोळा करण्यासाठी कसा वापर केला जातो हे सांगितले.

अचूकतेसह डेटा कॅप्चर आणि विश्लेषण करण्याची क्षमता तसेच उपग्रह आणि ड्रोनमधून मिळवलेल्या डेटाच्या वाढत्या गुणवत्तेमुळे ही अचूकता कशी शक्य आहे त्यामुळे शहरी नियोजन, वाहतूक आणि पर्यावरण व्यवस्थापन यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये नियोजन करण्यास सदर टेक्नोलॉजीची उपयुक्तता सोप्या भाषेत नमूद केली.

तिसर्‍या सत्रात केव्हीएन नाईक महाविद्यालय नाशिक येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र झोळेकर यांनी एप्लीकेशन ऑफ जीआयएस बेस्ड एमसीडीएम टेकनिक्स फॉर डिटेक्शन ऑफ पोटेन्शियल झोन्स फोर डिफरंट जॉग्रफिकल एनवोर्मेन्ट यावर मार्गदर्शन केले. अनेक प्रकारचे क्रायटेरिया वापरून शेती, जल, मृदा यांचे संवर्धन कसे केले जाते हे सांगितले.

के. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात Geospatial Technology या विषयावर कार्यशाळा संपन्न
बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणाचा निकाल लवकरच; उद्या अंतिम सुनावणी

चौथ्या सत्रात एसएनजेबी महाविद्यालय चांदवड येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. चांगदेव कुदनर यांनी प्रॉब्लेम्स अँड प्रोस्पेक्ट्स इन डेमोग्राफी यावर सखोल विचार मांडले. जिओस्प्याशियल टेक्नोलॉजी आणि लोकसंख्या यांची संशोधनातील भूमिका आणि भारतीय परिस्थिती यावर मतप्रवाह कसे आहेत यावर चर्चा केली. पाचव्या सत्रात मविप्र संचालित सटाणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे डॉ. भारत गडाख मानवी भूगोलात भौगोलिक माहिती प्रणाली आणि सुदूर संवेदन यांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सदर राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी आयक़्युएसी समन्वयक वैशाली गांगुर्डे, राज्यशास्र विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद दुधाने, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रुपाली शिंदे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद सानप, मराठी विभाग प्रमुख तुकाराम भवर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अरविंद केदारे, नाना चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com