जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवा: गावित

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवा:  गावित

पाळे खुर्द । वार्ताहर | Palle Khurd

ग्रामविकासासाठी जनतेने (Village development) निवडून देऊन टाकलेला विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात सरपंच (sarpancha) व सदस्यांनी अभ्यासूपणे गावाचे प्रश्न सोडविणे गरजेचे असून मतदारसंघाच्या (constituencies) विकासासाठी मी नेहमी आपल्यासोबत राहील असे आश्वासन माजी आमदार जे. पी. गावित (Former MLA J. P. Gavit) यांनी केले.

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत (election) निवडून आलेल्या थेट सरपंच व सदस्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Marxist Communist Party) वतीने करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार गावित बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदा सोनवणे होते. गावित पुढे म्हणाले की, कळवण तालुक्यात सरपंच व सदस्यांनी सजग पणे काम करणे गरजेचे असून ग्रामसेवकांच्या आणि ठेकेदारांच्या मनमानीला न घाबरता अभ्यासूपणेे स्वतः निर्णय घ्यावेत.

आपल्या अधिकारांचा वापर गावाच्या भल्यासाठी केल्यास जनता नेहमी तुमच्या पाठीशी राहील त्यामुळे विकासाला प्राधान्य देऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करा असे आवाहन गावित यांनी केले. यावेळी सावळीराम पवार, भिका राठोड, हिरामण गावित, मोहन जाधव, टिनू पगार, बाळासाहेब गांगुर्डे, शिंदे गटाचे तालुकाप्रमुख शरद पगार, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र पगार, संदीप वाघ, प्रकाश पवार, भाऊसाहेब पवार, साहेबराव पवार, रशीद शेख, भरत शिंदे, बाबाजी जाधव, सचिन वाघ, राकेश वाघ, केदा सोनवणे, भाऊसाहेब वाघ, दामू पवार, पोपट आहेर, वसंत रौंदळ, बाबाजी जाधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com