जनतेचा विश्वास सार्थ ठरवा: भुसे

जनतेचा विश्वास सार्थ ठरवा: भुसे

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

जनतेने विकासकामांच्या (Development works) पुर्ततेची अपेक्षा ठेवत विजयाची माळ तुमच्या गळ्यात टाकली आहे.

त्यामुळे निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी प्रलंबित कामांची पुर्तता करत गावाचा विकास (Village development) साधण्यासाठी आगामी काळात सक्रिय राहावे यासाठी आवश्यक ती सर्व मदत आपण करू, अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना दिली.

येथील बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयात तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच (sarpancha) व ग्रामपंचायत सदस्यांचा पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. निवडणुका (election) पार पडल्या असल्याने निवडून आलेल्या उमेदवारांनी आता गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून काम करण्याची गरज आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत कसा पोहचेल यासाठी ग्रामपंचायतींनी योग्य भुमिका बजवावी, असे आवाहन करत पालकमंत्री भुसे यांनी विकासकामांच्या पुर्ततेव्दारे गावाचा विकास कसा होईल यासाठीच प्रयत्नशील राहावे. विकासकामांसाठी निधी (fund) कमी पडणार नाही याची काळजी आपण स्वत: घेवू, असे आश्वासन दिले.

ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदार संघातील (Malegaon Outer Constituency) दाभाडी, पाटणे, सौंदाणे, वजीरखेडे व मोहपाडे या राजकीयदृष्ट्या महत्वपुर्ण मानल्या जाणार्‍या पाच मोठ्या ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर करजगव्हाण ग्रामपंचायतीत सात सदस्य प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले आहेत. पाच सरपंच व 66 ग्रामपंचायत सदस्य या निवडणुकीत मताधिक्य घेत निवडून आले आहेत. हे यश बाह्य मतदार संघात सेनेचे वर्चस्व व जनतेचा पालकमंत्र्यांवर विश्वास कायम असल्याचे दर्शविणारे ठरले असल्याचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख सुनिल देवरे, तालुकाप्रमुख मनोहर बापू बच्छाव, महानगरप्रमुख विनोद वाघ, प्रमोद पाटील, सखाराम घोडके, नीलेश आहेर, प्रकाश अहिरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण, शहरप्रमुख छाया शेवाळे, यशपाल बागुल, राजेश अलीझाड, किरण पाटील, देवा वाघ, चंद्रकांत अहिरे आदींसह नवनिर्वाचित सदस्य, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com