ग्रामपंचायतींमुळे सामान्यांना न्याय - बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे

ग्रामपंचायतींमुळे सामान्यांना न्याय - बंदरे व खनिकर्म मंत्री भुसे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शासनाच्या वेगवेगळ्या योजना तळागाळाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवित सामान्यातला सामान्य माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतींचे ( Grampanchayat )कार्य महत्वपूर्ण आहे.

चंदनपुरी ग्रामपंचायत ( Chandnpuri Grampanchayat )सदस्य या दृष्टिकोनातून निश्चितच प्रयत्न करुन त्यांचे कार्य पूर्णत्वास नेतील, अशी ग्वाही आपण ग्रामस्थांना देतो, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे (State Ports and Mines Minister Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना केले.

तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत विकास योजना व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विकास निधीतून 34 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

नूतन ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम अतिशय सुंदर, निटनेटके व सर्व सोयीसुविधा युक्त झाले असून तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांनी ही इमारत आवर्जून बघावी, असे आवाहन ना. भुसे यांनी यावेळी करत ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे कौतुक केले.

लोकार्पण सोहळ्यास सरपंच विनोद शेलार, उपसरपंच सविता सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, सरला पवार, दिपाली सोनवणे, मनोहर जोपळे, अशोक अहिरे, मंगलबाई पवार, मनीषा पवार, वैशाली पाटील, नितीन सुर्यवंशी, समाधान उशिरे, लक्ष्मी सकट, कैलास शेलार, सोनाली शेलार व ग्रामविकास अधिकारी टी.एम. बच्छाव, पिनू पाटील आदींसह परिसरातील महिला व पुरुष ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com