Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात

Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वेतन संबंधी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील (Office of the Deputy Director of Education) कनिष्ठ लिपिकाने (Junior Clerk) ५० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी करून ती स्विकारतांना एसीबीच्या (ACB) पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आहे...

Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात
नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण

याबाबत अधिक माहिती अशी की, दिगंबर अर्जुन साळवे (कनिष्ठ लिपिक, शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक, वर्ग ३, वय ५५, रा. टाकळी, भीमशक्ती नगर, नाशिक) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार हे नाशिक शहरातील एका खासगी शाळेत १३ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात शिक्षण सेवक (Education Servant) म्हणून नोकरीस होते व त्यानंतर शिपाई या पदासाठी त्यांची मान्यता आली.

Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात
Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

यानंतर ते १ जानेवारी २०२३ पासून ते अतापर्यंत त्या शाळेत शिपाई या पदावर कार्यरत आहे. त्यांना आतापर्यंत कोणत्याही प्रकारे वेतन मिळालेले नाही. वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेच्या मार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार (Complainant) यांच्याकडे पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी करून ती बुधवार (दि.१३) रोजी पचासमक्ष नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वीकारली. यावेळी त्यांना पकडण्यात आले आहे.

Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात
Maratha Reservation : "दिल्लीत मला विचारलं मनोज जरांगे कौन है"? CM शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान, ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (Deputy Superintendent of Police Anil Badgujar) यांच्या नेतृत्वाखाली पो.ना, मनोज पाटील, दीपक पवार, शितल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.

Nashik Crime News : लाचखोर कनिष्ठ लिपिक ताब्यात
मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com