जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक रद्द

जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक रद्द

आज ग्यारवी शरीफचा मोठा सण

जुने नाशिक | प्रतिनिधी Old Nashik

मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान पिराने पीर हजरत सय्यदना अब्दुल कादिर जिलानी गौस-ए-आज़म यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा ग्यारवी शरीफचा मोठा सण Gyarvri Sharif festival आज (दि.17) मुस्लिम बांधव साजरी करणार आहे.या पार्श्वभूमीवर जुने नाशिक तसेच मुस्लिम बहुल भागात सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, काल सायंकाळी भाविकांनी घरात मचिरागाचे फातेहा पठाण करीत एकमेकाना प्रसाद वाटप केले.

दरम्यान सण घरातच साजरा करा, असे आवाहन धर्मगुरू तथा खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे. सणानिमित्त दरवर्षी शहरातून मिरवणूक काढण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु करोनामुळे ही मिरवणूक काढण्यात आली नव्हती. यावर्षी पैगंबर साहेब जयंतीची मिरवणूक निवडक उलेमांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.

यानंतर जुलूस-ए-गौसिया मिरवणूक काढण्याची घोषणा शहरातील मुस्लिम बांधवांची मध्यवर्ती संघटना सुन्नी मरकजी सिरत कमिटीतर्फे गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. मात्र त्रिपुरा हिंसाचाराच्या विरोधात राज्यभर पुकारण्यात आलेल्या बंदवेळी राज्यातील काही भागांमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या. या भागातील वातावरण अद्यापही पूर्णपणे शांत झालेले नाही. यामुळे शहरातील ही नियोजीत मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय सुन्नी मरकजी सिरत कमिटीने घेतला, अशी माहिती खतीबे शहर हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली आहे.

मिरवणूक ऐवजी सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात नियाज़ तयार करून फातेहा पठण करावे, यावेळी देशाच्या, शहराच्या व समाजाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चिरागाचे फातेहा

मुस्लिम बांधवांनी काल सायंकाळी मगरीच्या नमाजानंतर निमित्त घरोघरी चिराग रोशन करीत विशेष फातेहा पठाण केले. यासाठी काही भाविकांनी चांदीचे नवीन चिराग देखील घेतले. अत्यंत धार्मिक पद्धतीने हा सोहळा झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com