पुरातून टोमॅटो वाहतुकीचा अफलातून जुगाड

पुरातून टोमॅटो वाहतुकीचा अफलातून जुगाड

करंजी खुर्द । वार्ताहर | Karanji Khurd

यावर्षी अतिपावसामुळे (heavy rain) शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नदी, नाले यांना मोठ्या प्रमाणात पूर (flood) आल्याने त्यावरील फरशी पूल वाहून गेले आहे.

तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या सोमठाणे-ब्राम्हणवाडे शिवेलगत असलेल्या देवनदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या ठिकाणचा पूल (bridge) देखील वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीला अडचणी येत होत्या. मात्र, यावरही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मार्ग काढत शेतकर्‍यांनी रिकाम्या प्लास्टिकच्या ड्रमचा (Plastic Drum) जुगाट बनवत त्याद्वारे शेतमाल नदीतून वाहतूक करण्याला प्राधान्य देवून शेतमाल बाजारपेठेत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे.

यंदा पावसाने घातलेला धिंगाणा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला आहे. अनेक ठिकाणी फरशी पूल वाहून गेले आहेत अशा स्थितीतही मार्ग काढण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सोमठाणे शिवारात देव नदी परिसरात यावर्षी जास्त पाऊस झाल्याने आलेल्या पुरात पूल वाहून गेल्यानंतर शेतकर्‍यांनी

(farmers) शेतमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लास्टिकच्या ड्रमचा जुगाड बनवत त्या माध्यमातून मार्केटला जाण्याच्या नित्यक्रमात खंड पडू दिला नाही. सोमठाणे-ब्राम्हणवाडेच्या सीमेवर घुमरे टोकवस्ती आहे. या वस्तीवर बरेच शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहेत. या शेतकर्‍यांना वस्तीवर जाण्यासाठी देव नदीवर सिमेंट पाईप (Cement pipe) टाकून पूल बनविण्यात आला होता.

परंतु काही दिवसांपूर्वी देव नदीला पूर आला आणि हा पूल वाहून गेला (bridge was swept away) सुमारे महिन्यापासून या वस्तीवरील शेतकर्‍यांचा टोमॅटो (tomato) माल पिंपळगाव बसवंत बाजार समितीत (Pimpalgaon Baswant Bazaar Committee) विक्रीसाठी जावू लागला आहे.

दररोज दोन ते तीन पिकअप जीपमध्ये जाळ्या भरून टोमॅटो मार्केटला नेला जात आहे. मात्र, पूल वाहून गेल्याने या शेतकर्‍यांना शेतमाल नेण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे महेश घुमरे, सागर डिक्के, सचिन आव्हाड, विठ्ठल घुमरे आदींसह शेतकर्‍यांनी प्लास्टिकच्या पाण्याचे दोनशे लिटरचे दोन ड्रम विकत घेत त्यावर फेब्रिकेशन करून डिझाइन केले.

दोन दोरखंडाला हा पाळणा बांधून त्यावर टोमॅटोच्या 8 जाळ्या वाहण्याचे काम गेल्या महिनाभरापासून हे शेतकरी करीत आहेत. टोमॅटो नाशवंत पीक (tomato crop) असून ते वेळेवर विक्रीसाठी पाठवावे लागते. मात्र, टोमॅटो हातात येण्याची वेळ आणि शिवनदीच्या पुरात पूल वाहून जाण्याची वेळ एकच झाल्याने शेतकर्‍यांना या नदीच्या पाण्यातून टोमॅटो वाहतुकीसाठी कसरत करावी लागत आहे.

कायमस्वरूपी पूल होणे गरजेचे ब्राम्हणवाडे शिवारातील घुमरे टोक वस्तीवरील 6 मुले शाळेत जातात. मात्र, नदीला पूर असल्याने व पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. गुडघाभर पाण्यातून पालक विद्यार्थ्यांची ने-आण करतात तर शाळेला दांडी मारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. देवनदीवर सिमेंटचे पाईप टाकून आम्ही स्वखर्चातून पूल उभारला होता. मात्र, तोही वाहून गेल्याने आम्हाला जीव धोक्यात घालून व वेळप्रसंगी पोहत जावून शेतमाल बाजारात न्यावा लागत आहे. याठिकाणी कायमस्वरुपी पूल होणे गरजेचे आहे.

- महेश घुमरे, शेतकरी (ब्राम्हणवाडे)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com